हेरले / प्रतिनिधी
पालकांनी आपल्या पाल्यांना छ. शिवाजी महाराजांचे चरित्र वाचायला लावले तर महाराजांचा आदर्श घेवून त्यांच्या आयुष्यात नक्कीच बदल घडेल असे प्रतिपादन प्रा.डॉ. संभाजी पाटील यांनी केले.ट्विंकल इंग्लिश स्कूलमध्ये शिवजयंतीनिमित् खास विद्यार्थी व पालक यांच्यासाठी स्पर्धांचे बक्षीस वितरण प्रसंगी ते बोलत होते. पत्रकार राजू पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी संतोष बाटे होते. शिवसेनाउपशहराध्यक्ष नितीन दळवी उपस्थित होते. स्वागत मुख्याध्यापिका मनीषा बाटे , प्रास्ताविक उपमुख्याध्यापिका सुषमा हाळदे यांनी केले. नियोजन प्रतीक्षा पाटील, शुभांगी भोसले, सीमा लोखंडे यांनी केले यावेळी पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो
शिरोली माळवाडी येथील ट्विंकल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये शिवजयंती निमित्त आयोजित पालक, विद्यार्थी स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार करताना प्रा.मनीषा बाटे,प्रा. डॉ. संभाजी पाटील अध्यक्ष संतोष बाटे, नितीन दळवी, सुषमा हाळदे ,आदी
No comments:
Post a Comment