Monday, 28 February 2022

गारगोटी हायस्कूलवर दगडफेक करून मुख्याध्यापक व शिक्षकांना धमकी देणाऱ्यावर कडक कारवाई करावी : आम.आसगांवकर यांची जिल्हा पोलीसप्रमुख व जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी


कोल्हापूर / प्रतिनिधी
      गारगोटी हायस्कूल व श्री. समर्थ ज्युनिअर गारगोटी (ता.भुदरगड) या प्रशालेवर दगडफेक करून शालेय साहित्याची तोडफोड करत शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांना धमकी, मारहाण करणाऱ्यावर कडक कारवाई करून शाळा व कर्मचाऱ्यांना संरक्षण द्यावे अशी मागणी आमदार जयंत आसगांवकर यांनी जिल्हा पोलीसप्रमुख व जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. 
      गारगोटी हायस्कूल व श्री.समर्थ ज्युनिअर गारगोटी या शाळेत शनिवारी दु.१२.४५ च्या दरम्यान विशाल कदम या तरुणाने मद्यधुंद अवस्थेत शाळेवर दगड मारले. शाळेच्या खिडकीच्या काचा दगड मारून फोडल्या. अ‍ॅम्पलीपायर मशीन, खुर्च्या, घड्याळ, टेबलवरील काचा फोडून शालेय साहित्याचे नुकसान केले. वर्ग सुरु असताना शिक्षकांना शिव्या देणे सुरु केले. शिक्षकांबाबत एकेरी, अर्वाच्च भाषा वापरली आहे. मोठमोठ्याने ओरडून वर्गातील बेंचवर लाथा मारून विद्यार्थ्यासमोर दंगा केला. यावेळी त्यास जाब विचारला असता अंगावर धावून येऊन शिवीगाळ करत शाळा पेटवून देण्याची धमकी दिली तसेच शाळेचे कर्मचारी नामदेव नारायण शिंदे यास लाकडी खुर्ची मारून  जखमी केले. दरम्यान पोलिसांना बोलविल्यानंतर पोलीस त्याला ताब्यात घेत असतांना त्याने पोलिसांनाही धक्काबुक्की केली.
    शालेय साहित्याची तोडफोड करत शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांना धमकी, मारहाण करणाऱ्यावर कडक कारवाई करून शाळा व कर्मचाऱ्यांना संरक्षण द्यावे अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी शिष्टमंडळात कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस. डी. लाड, कृती समितीचे कार्याध्यक्ष बाबा पाटील, शिक्षक संघटनेचे राजेश वरक, उदय पाटील, गजानन काटकर आदीसह शिक्षकसंघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

       फोटो कॅप्शन
गारगोटी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज या प्रशालेतील साहित्याची तोडफोड करून शिक्षकांना धमकी देणाऱ्या नराधमाला अटक करण्याची मागणी निवेदनाद्वारे  जिल्हा पोलिस अधिक्षक मा.शैलेश बलकवडे यांचेकडे करताना शिक्षक आमदार मा.जयंत आसगांवकर, कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष श्री. एस.डी.लाड, बाबासाहेब पाटील, राजेश वरक,उदय पाटील, गजानन काटकर  व इतर

No comments:

Post a Comment