हेरले / प्रतिनिधी
हेरले येथे सोलापूर - रत्नागिरी हायवे भूसंपादन मोबदला संदर्भात भूसंपादन अधिकारी सुनील घाग यांचे बरोबर हेरले मौजे वडगाव येथील प्रकल्पग्रस्त शेतक-यांची बैठक झाली. ५ तारखेस नोटीस आणि ताबडतोब मिटिंग यामुळे शेतक-यांच्यामध्ये गोंधळ आणि संभ्रम निर्माण झाला. त्यामुळे आज या शेतकऱ्यांच्या वतीने हातकणंगले पंचायत समितीचे माजी सभापती राजेश पाटील यांनी बाजू मांडत अधिकारी सुनिल घाग यांचेशी विविध मुद्यांवर चर्चा केली.पुढील दिशा लवकरच ठरवून लढा उभारला जाईल असे राजेश पाटील यांनी सांगितले.
सरसकट हेरले येथील जमिनीचे व्हॅल्यूशन धरलेमुळे गावठाण लगत असणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. योग्य तो मोबदला मिळत नाही ,शासन निर्णयाप्रमाणे ही रक्कम शेतकऱ्यांना मान्य नाही , या बैठकी नंतर शेतकऱ्यांची बैठक झाली. त्यामध्ये असे ठरवण्यात आले की नोटीस अभ्यास करता आला नसल्यामुळे सदर अधिकारी यांच्याकडे मुदत घेत अर्ज करण्याचे ठरले.
या सभेचे नेतृत्व माजी सभापती राजेश पाटील , स्वाभिमानी शेतकरी संघटना हातकणंगले तालुका सरचिटणिस मुनिर जमादार यांनी केले. यावेळी शेतकरी सुनील पाटील , राजगोंडा पाटील , मन्सूर पठाण , महंमद नायकवडी ,कृष्णा कुरणे , माणिक लाड आदीसह अन्य शेतकरी उपस्थित होते. पुढील दिशा लवकरच ठरवून लढा उभारला जाईल असे राजेश पाटील यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment