Monday, 7 February 2022

भाजप हा सर्व सामान्य माणसांचे हित आणि नितीमुल्ये जोपासणारा पक्ष - भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील

हेरले / प्रतिनिधी

भारतीय जनता पक्ष हा सर्व सामान्य माणसांचे हित आणि नितीमुल्ये जोपासणारा पक्ष आहे. त्यामुळेच तरुण वर्ग मोठ्याप्रमाणात भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत आहे. असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केले.
मौजे वडगाव ता. हातकणंगले येथील कार्यक्रमात बोलत होते. महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ. शौमिका महाडिक व दलितमित्र, जि.प.सदस्य अशोकराव माने यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी तालुका सरचिटणीस भूपाल कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक युवा कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
प्रदेशाध्यक्ष पाटील पुढे म्हणाले, अपघाताने आलेले राज्याचे आघाडी सरकार हे सर्वच क्षेञात अपयशी ठरले आहे. ग्रामीण भागातील समाजासाठी एकही सकारात्मक काम आघाडी सरकारने पूर्ण केलेले नाही. त्यामुळे जनतेतून तिव्र नाराजी आहे. ती नाराजी येणाऱ्या महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीत दिसून येईल असे त्यांनी सांगितले. 
याप्रसंगी जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सौ. शौमिका महाडिक, अशोकराव माने, तालुका अध्यक्ष राजेश पाटील यांची भाषणे झाली.
नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच चंद्रकांतदादा पाटील व शौमिका महाडिक यांच्या हस्ते भाजप शाखा फलकाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी जि. प. सदस्य  अशोकराव माने (बापू ), भाजपा किसान मोर्च्या जिल्हाध्यक्ष भगवान काटे, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल पाटील, भाजप तालुका सरचिटणीस भूपाल कांबळे, माजी तालुका चिटणीस आनंदा थोरवत, ग्रा. पं. सदस्य अविनाश पाटील, प्रदीप लोहार, स्वप्नील चौगुले, सुनील खारेपाटणे, सागर अकिवाटे, पवन जाधव, ओंकार जाधव, अजिंक्य थोरवत यांच्या सह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
फोटो......
मौजे वडगाव ता. हातकणंगले येथे भाजप शाखा फलकाचे उद्घाटन प्रसंगी प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील, शौमिका महाडिक, राजेश पाटील, अशोकराव माने, भगवान काटे, भुपाल कांबळे आदी.

No comments:

Post a Comment