हेरले /प्रतिनिधी
मौजे वडगाव( ता. हातकणंगले) येथील गावठाण ते पाझर तलाव रस्ता गावठाण पासून सुरु करावा अन्यथा २ मार्चला सामूहिक आत्मदहन करण्याचे निवेदन कोल्हापूर जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र क्षीरसागर यांना देण्यात आले होते.
मौजे वडगाव येथील गावठाण ते पाझर तलाव रस्त्याची सुधारणा गेल इंडिया कंपनीचा सीएसआर फंडातून होत आहे. ग्रामपंचायतीच्या ग्रामसभा ठरावानुसार या रस्त्याच्या कामाची वर्क ऑर्डर गावठाण पासून पाझर तलाव पर्यंत अशी आहे. परंतु सुरुवातीचे अंतर सोडून काम सुरू केल्याने गावतील शेतकऱ्यांनी हे काम बंद पाडले. दरम्यानच्या काळात खासदार धैर्यशील माने व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडीक यांनी गावठाण पासून रस्ता सुरू करावा असे लेखी पत्र जिल्हा परिषद कार्यकारी अभियंत्यांना दिले. त्यानंतर बांधकाम विभागाने ग्रामपंचायतीला गावठाण पासून हद्द निश्चित करावी असे लेखी पत्र दिले होते. परंतु पत्र येऊन महीना होऊन गेला तरीही ग्रामपंचायतीकडून कोणतीही हालचाल झाली नसल्यामुळे गावातील शेतकरी व पदाधिकारी मनोहर चौगले, गुणधर परमाज, बाळासो थोरवत, मधुकर अकीवाटे, शिवसेनेचे सुरेश कांबरे, सुनील खारेपाटणे, स्वप्नील चौगुले, यांनी आत्मदहन करण्याचे लेखी निवेदन जिल्हा परिषद बांधकाम विभागाला दिले होते. परंतु निवेदन दिलेल्या दिवशीच ग्रामपंचायतीने रस्त्याचे हद्द निश्चितीचे काम गावठाण पासून सुरू केल्यामुळे २ मार्च रोजी शेतकऱ्यांच्या कडून होणारे आत्मदहन स्थगित करण्यात आले आहे.
फोटो
मौजे वडगांव: येथे आत्मदहन चा इशारा दिल्यामुळे गावठाण ते पाझर तलाव रस्ता ग्रामपंचायतीच्या वतीने गावठाण पासून हद्द निश्चित करण्यात आला.
No comments:
Post a Comment