हेरले / प्रतिनिधी
श्री.बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप संचलित हेरले हायस्कूल हेरले* मधली इयत्ता नववी एम. सी. सी.विषय अंतर्गत एक रात्री मुक्कामी पदभ्रमंती शनिवार दिनांक ५ मार्च ते ६ रोजी उदगिरी,चांदोली वन्यपरिसरात पार पाडली.
यामध्ये बावीस विद्यार्थी, दहा विद्यार्थ्यींनी, असे एकूण बत्तीस विद्यार्थ्यांच्या सह मुख्याध्यापक पाच शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेत उदगिरी मधील स्वराज्य संघटनेचे स्वयंसेवक यांनी सहभाग घेतला.
ट्रेकिंग अंतर्गत खालील कार्यक्रम घेण्यात आले दोन टप्प्यात २२ कि.मी. पायी जंगलातून भ्रमंती,विविध औषधी वनस्पती माहिती, विविध प्राणी पक्षी निवास,आवाज निरिक्षण,रात्री चे जेवण स्वतः बनवणे,शेकोटी व सांस्कृतिक कार्यक्रम,अवकाशातील तारे व दिशा यांची माहिती, रात्री ड्युटी ,सकाळी भूपाळी,चहा नाष्टा,गुरवाडी येथील काळंम्मा देवी परिसर स्वच्छता,एम सी सी कवायात व डेमो उपस्थित भाविकांची वाह..वाह.. मिळवून गेला.
पदभ्रमंती यशस्वी होण्यासाठी श्री. बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक अंबप अध्यक्ष विजयसिंह माने, कार्याध्यक्ष विकासराव माने,जिल्हा परिषद सदस्या सौ.मनिषा विजयसिंह माने, कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण विभाग, कोल्हापूर जिल्हा एम.सी.सी. समादेशक कुमार पाटील साहेब, हेरले हायस्कूलचे मुख्याध्यापक अशोक काळे
एम.सी. सी. प्रमुख हरिश्चंद्र गायकवाड , बबन हुजरे,सर्व पदभ्रमंती व निवास सोय स्वराज्य संघटनेचे संस्थापक सुनिल पाटील व बंधू अंकुश पाटील तसेच समीर पुजारी,सखा पाटील, सागर पाटील शिक्षक काशिलिंग माने, किरण गायकवाड हेरले हायस्कूलमधील सर्व शिक्षक शिक्षिका,शिक्षकेत्तर,पालक, विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
No comments:
Post a Comment