पेठवडगांव / प्रतिनिधी
बुधवार दि.१६ रोजी वडगाव विद्यालय (ज्युनिकॉलेज/ तंत्रशाखा) पेठ वडगाव या विद्यालयात'बहुजन हिताय बहुजन सुखाय' या उद्देशाने स्थापन केलेल्या शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरचे संस्थापक, थोर शिक्षणतज्ञ, शिक्षण महर्षी कै. एम.आर. देसाई
यांच्या स्मृतीदिनानिमित्त इंग्रजी भाषा दिन साजरा करण्यात आला. कु. भक्ती लाड, कु. आर्या गुरव, कु. दिशा पाटील या विद्यार्थिनींनी त्यांच्या विषयी आपले विचार मांडले.
अध्यक्षीय मनोगत विद्यालयाचे प्राचार्य
आर.आर. पाटील यांनी केले. या कार्यक्रमासाठी उपप्राचार्य एस. डी. माने , पर्यवेक्षक डी.के. पाटील , परीक्षा विभाग प्रमुख डी.ए. शेळके , तंत्र शाखा प्रमुख अविनाश आंबी , कार्यालयीन प्रमुख के.बी. वाघमोडे , जेष्ठ शिक्षक डी.एस. कुंभार , मिलींद बारवडे , सौ. आर.आर. पाटील , सौ. एस एस चव्हाण, इंग्रजी विषयाचे सर्व शिक्षक, शिक्षकवृंद , शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जे.एम. मणेर यांनी केले. छायाचित्रण एस. आर. पाटील यांनी केले.
No comments:
Post a Comment