हेरले प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेकडून प्रतिवर्षी पाचवी व आठवी शासकीय शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी महिन्यात घेण्यात येते .पण यावर्षी या परीक्षेच्या संदर्भात अजूनही परिषदेकडून निश्चित तारीख जाहीर झालेली नाही. त्यामुळे राज्यातील सदर परीक्षेसाठी बसणारे सर्व विद्यार्थी, त्यांना शिकवणारे शिक्षक व पालक संभ्रमावस्थेत आहेत. या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपला शिकवणाऱ्या शिक्षकांनी आपला अभ्यासक्रम पूर्ण करून सरावावर लक्ष केंद्रित केले आहे .पण परीक्षा केव्हा होतील याविषयी सर्वजण साशंक आहेत. तेव्हा लवकरात लवकर तारीख जाहीर करून एप्रिल महिन्याच्या आतच सदर शासकीय शिष्यवृत्ती परीक्षा पार पाडावी, सर्व विद्यार्थी शिक्षक व पालक यांना आश्वस्त करावे अशी आग्रही मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने आज शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांना निवेदनाद्वारे केली .सदर मागणीचे निवेदन शिक्षक सेनेचे मार्गदर्शक श्री शिवाजी पाटील यांनी दिले .यावेळी शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष टी. आर. पाटील, शहर अध्यक्ष स्नेहल कुमार रेळेकर, शहर कार्याध्यक्ष प्रदीप जानकर उपस्थित होते. सदर मागणीचे निवेदन तात्काळ शिक्षण परिषदेकडे पाठवले जाईल असे आश्वासन शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांनी शिक्षक सेनेच्या शिष्टमंडळास दिले.
फोटो
शिक्षक सेनेच्या वतीने शिक्षणसंचालक यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे विविध मागण्या केल्याचे निवेदन शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांना देतांना पदाधिकारी
No comments:
Post a Comment