हेरले /प्रतिनिधी
हातकणंगले तालुक्यातील मौजे वडगाव येथे ग्रामदैवत हनुमान व विठ्ठल रुक्मिणी मंदिरात ४था वर्धापन दिन व अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून त्याचा प्रारंभ १० एप्रिल रोजी रामनवमी दिवशी होणार आहे. १० ते १६ एप्रिल या सात दिवस चालणाऱ्या धार्मिक कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सोहळा समितीने केले आहे.
सात दिवस चालणाऱ्या या धार्मिक कार्यक्रमास ह. भ. प. आबासो देसाई महाराज (कोल्हापूर), ह .भ. प. विनायक पाटील महाराज (गिरोली), ह. भ. प. हरिप्रसाद चांदेकर महाराज (चांदे) ,श्री सद्गुरु आदिनाथ महाराज श्री निरंजन आश्रम (मौजे वडगाव) ,ह. भ. प. विठ्ठल पाटील महाराज (शिरोली) ,ह. भ. प. पांडुरंग काळे महाराज (अतिग्रे) ,यांचे प्रवचन होणार आहे. तर संध्याकाळी ह. भ. प. युवा कीर्तनकार ओंकार सूर्यवंशी महाराज (तुरंबे), ह .भ. प. उत्तम गुरव महाराज (माधववाडी), ह. भ. प. वसंत शिंदे महाराज (पिशवी) ,ह .भ .प. वेदांताचार्य कृष्णानंद शास्त्री महाराज (कोल्हापूर) ,ह. भ. प. राजीवजी सुतार महाराज (सांगवडे ),ह. भ. प. हनुमंत पाटील महाराज (चिंचणी) ,यांचे कीर्तन होणार आहे दिनांक १६ एप्रिल रोजी सकाळी ७ ते ११ पर्यंत भव्य दिंडी सोहळा व ह .भ. प. भाऊसो पाटील महाराज (जांभळी) यांचे काल्याचे कीर्तन होऊन महाप्रसादाने या सप्ताहाची सांगता होणार आहे. या कार्यक्रमाचे ३० वे वर्ष आहे. दररोज पहाटे काकड आरती, सकाळी ज्ञानेश्वरी पारायण, तर संध्याकाळी ५ ते ६ या वेळेत हरिपाठ होणार आहे. रात्री ७.३० ते ९.३० वा. कीर्तनाचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा समितीचे अध्यक्ष प्रकाश वाकरेकर, यांनी दिली.
No comments:
Post a Comment