Wednesday, 13 April 2022

शिक्षक संघाने घेतली महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मा. पृथ्वीराज चव्हाण यांची भेट.


हेरले / प्रतिनिधी

    हाॅटेल सयाजी कोल्हापूर येथे  महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री  पृथ्वीराज चव्हाण यांनी नागरी सहकारी बँकामधून सहकार चळवळीचे नेतृत्व करणार्‍या कार्यकर्त्यांशी सुसंवाद साधला.

    *यावेळी कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या महिला आघाडीचं कणखर नेतृत्व महिला जिल्हाध्यक्षा तसेच प्राथमिक शिक्षक बँकेच्या विद्यमान संचालिका  लक्ष्मीताई पाटील  यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण  यांना शिक्षकबँकेच्या अडचणी संदर्भात कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने सहकार क्षेत्रातील प्रश्नांविषयी चर्चा करून निवेदन दिले.
      विषय या प्रमाणे पगार तारण बँकेला वन टाइम सेटलमेंट योजना लागू करावी,  शिक्षक बँकेचा गतसालातील  प्रलंबित डिव्हीडंट  रिझर्व बँकेच्या  परवानगी शिवाय तो सभासदांना वाटता यावा,
शिक्षकांच्या कुटुंबातील  शेतीला शिक्षक बँके मार्फत कृषी योजनांचा लाभ मिळावा,
 शिक्षकांची मुले लघु उद्योगात वगैरे असतात त्यांना उद्योग विषयक सवलतीसह कर्ज मिळावे, शिक्षकांच्या मुलांना शैक्षणिक कर्जाची सुविधा मिळावी,ज्याशासकीय योजना शेडूल तसेच सरकारी बँकेमार्फत ज्या योजना व सवलती दिल्या जातात त्या शिक्षकांना शिक्षक बँकेमार्फत  मिळाव्यात.

शिक्षक पतसंस्था मध्ये ब वर्ग ठेवीदारांना ठेव ठेवणे मुभा असावी,रिजर्व्ह बँकेने लादलेले सोनेतारण कर्जावरील निर्बंध रद्द करावे.*

    *असे विविध मागण्या संदर्भातील निवेदन देण्यात आले. त्यावर जिल्हानेते रघुनाथ खोत, महिला आघाडी नेत्या  लक्ष्मीताई  पाटील , जिल्हाध्यक्ष  रविकुमार पाटील  व जिल्हा सरचिटणीस  सुनील पाटील ,अरुण चाळके ,बाळकृष्ण हाळदकर,दुंदेश खामकर,किरण शिंदे यांच्या सह्या आहेत.

     यावेळी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री  नाम. सतेज उर्फ बंटी पाटील त्याच बरोबर बँक अध्यक्ष  निपुण कोरे , सामाजिक कार्यकर्ते  युवराज गवळी , केडीसीसी बँकेच्या संचालिका  स्मिता गवळी  यांचेसह सहकारातील अन्य जुनी जाणती मंडळी उपस्थित होती.

No comments:

Post a Comment