हेरले / प्रतिनिधी
६ मे ते ११ मे सहा दिवस लोकराजा राजर्षि छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्ष २०२२ साजरे करणेबाबत माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी मंगळवार रोजी प्रायव्हेट हायस्कूल कोल्हापूर येथे जिल्हा स्तरीय शिक्षक/ शिक्षकेत्तर सर्व संघटना यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीस अध्यक्ष व उपाध्यक्ष व संघटना प्रतिनिधी उपस्थित होते.
या बैठकीमध्ये लोकराजा राजर्षि छत्रपती शाहु महाराज कृतज्ञता पर्वाचे आयोजन करणे संदर्भात नियोजन करण्यात आले. या पर्वामध्ये शाळा व महाविदयालय स्तरावरील विद्यार्थ्यांच्या साठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. तसेच माध्यमिक शिक्षण विभागामार्फत चित्ररथाचे आयोजन करणेत आलेले आहे. चित्ररथाकरीता आर्थिक सहाय्य करणेकरीता विविध संस्थाकडून वर्गणी जमा करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सुपूर्द करणेकरिता बैठकीमध्ये ठरलेप्रमाणे विविध संस्थाचे अध्यक्ष व सचिव यांची प्रत्यक्ष भेट घेवून वर्गणीबाबत आवाहन करणेकामी सदर बैठकीमध्ये खालील समिती गठीत करण्यात आलेली आहे
अध्यक्ष एकनाथ आंबोकर,
उपाध्यक्ष एस.डी.लाड,सचिव आर.व्ही. कांबळे, सदस्य दादा लाड,दत्ता पाटील, इरफान अन्सारी, एस. एन. माळकर,बाबा पाटील ,राजेश वरक,उदय पाटील, व्ही. जी. पोवार,आर वाय पाटील,बाळ डेळेकर, खंडेराव जगदाळे,
संदिप पाटील आदींची निवड करून या प्रमाणे समिती गठीत करण्यात आली. या प्रसंगी काकासाहेब भोकरे, सुधाकर निर्मळेसह विविध संघटनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
समितीमार्फत निधी गोळा करणेकरीता समिती सदस्यानी शनिवार दिनांक १६/४/२०२२ रोजी सकाळी ९.०० वाजता जि.प. कार्यालयामध्ये एकत्रीत येवून सांगरूळ एज्युकेशन सोसायटी,प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग कोल्हापूर,स्वामी विवेकानंद एज्युकेशन सोसायटी,दि न्यु एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर,प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर,विदयापिठ एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर,ताराराणी विदयापिठ कोल्हापूर,चाटे शिक्षण संस्था कोल्हापूर,
शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर,
लक्ष्मी शिक्षण प्रसारक मंडळ साने गुरजी वसाहत कोल्हापूर,व. ज. देशमुख हायस्कूल कोल्हापूर, महाराणी शांतादेवी गायकवाड शिक्षण संस्था कोल्हापूर,
आंतरभारती शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर,कोल्हापूर चर्च कौन्सिल कोल्हापूर,मुस्लीम बोर्डींग ,सेंट झेवियर्स हायस्कूल, मुख्याध्यापक संघ,कोजिमाशी पतसंस्था ,कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढी बिंदूचौक,बहुजन माध्यमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्था,डी.वाय. पाटील शिक्षण संस्था कोल्हापूर आदी संस्थाना भेटी देऊन निधी जमा करणेचे सर्वानुमते ठरविणेत आले.
तसेच दिनांक ६ मे २०२२ रोजी राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांना आदरांजली म्हणून ठीक १० वा १०० सेकंद एका जागी स्तब्ध उभे राहणे यासाठी शाळेतील शिक्षक, मुले व पालकांना आवाहन करण्यास सांगितले. जागतिक विक्रम होईल असे शाळा स्तरावर नियोजन करावे असेही एकनाथ आंबोकर यांनी शिक्षक व शिक्षकेत्तर संघटनांना आवाहन केले.
फोटो
कोल्हापूर : माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी रोजी प्रायव्हेट हायस्कूलमध्ये जिल्हा स्तरीय शिक्षक/ शिक्षकेत्तर सर्व संघटना यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीस उपस्थित अध्यक्ष व उपाध्यक्षसह संघटना प्रतिनिधी
No comments:
Post a Comment