हेरले / प्रतिनिधी
हेरले (ता. हातकणंगले) येथे
श्री १००८ भगवान महावीर तीर्थंकर यांचा जन्मकल्याणक महोत्सव भव्य प्रमाणात साजरा करण्यात आला. या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन सकल दिगंबर जैन समाज वीर सेवा दल यांच्या वतीने करण्यात आले होते.
रथोत्सव भगवान महावीर जयंती निमित्त रथ, घोडे व वाद्यपथकांसह भव्य रथोत्सव मिरवणूकीचे उद्घाटन आमदार राजूबाबा आवळे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी जवाहर सहकार साखर कारखान्याचे संचालक आदगोंड पाटील, माजी सभापती राजेश पाटील, जि.प. सदस्य अशोक माने, रोहन पाटील, अमित पाटील, ए.बी. चौगुले, आदगोंड पाटील, प्रकाश चौगुले, डॉ. प्रविण चौगुले, उदय चौगुले, प्रकाश पाटील, ॲड. प्रशांत पाटील, सुनिल खोचगे, अमोल पाटील, पिंटू पाटील, भरतकुमार उंचगावे, अजित चौगुले आदी मान्यवरांसह श्रावक श्राविका मोठ्या संख्येंनी उपस्थित होते.
रविवार दि. १० एप्रिल रोजी रक्तदान शिबीर रक्तदात्यास प्रमाणपत्र व भेटवस्तू देण्यात आल्या.सोमवार दि. ११ एप्रिल रोजी लहान मुलांच्या विविध स्पर्धा संगीत खुर्ची स्पर्धा, लिंबू चमचा स्पर्धा दोरी उड्या स्पर्धा संपन्न झाल्या.मंगळवार दि. १२ एप्रिल रोजी सांस्कृतिक कार्यक्रम सचिन चौगुले (उदगांव) यांचा भक्तिगीत, भावगीत व संगीत आरतीचा कार्यक्रम संपन्न झाला. बुधवार दि. १३ एप्रिल रोजी महिलांसाठी विविध स्पर्धा रांगोळी स्पर्धा, कळस सजावट स्पर्धा, अष्टद्रव्य सजावट स्पर्धा संपन्न झाल्या.गुरुवार दि. १४ एप्रिल रोजी श्री १००८ भगवान महावीर जयंती पंचामृत अभिषेक पूजा भगवान महावीर जन्मकाळ सोहळा व भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली.
शुक्रवार दि. १५ एप्रिल रोजी सकाळी अहिंसा सदभावना रॅली व सायंकाळी मिरवणूक रथोत्सव भगवान महावीर जयंती निमित्त रथ, घोडे व वाद्यपथकांसह भव्य रथोत्सव मिरवणूक संपन्न झाली.
शनिवार दि. १६ एप्रिल रोजी धर्म को जानो प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न झाल्या.
फोटो
हेरले : रथोत्सव भगवान महावीर जयंती निमित्त रथ, घोडे व वाद्यपथकांसह भव्य रथोत्सव मिरवणूकीचे उद्घाटन आमदार राजूबाबा आवळे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी जवाहर सहकार साखर कारखान्याचे संचालक आदगोंड पाटील, माजी सभापती राजेश पाटील, जि.प. सदस्य अशोक माने, रोहन पाटील, अमित पाटील, ए.बी. चौगुले आदी मान्यवर
No comments:
Post a Comment