शिरोली येथील नवजीवन विविध कार्यकारी सहकारी विकास सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली असून तीस वर्षांची परंपरा कायम राहिली आहे. पेठ वडगाव बाजार समितीचे सभापती सुरेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली व माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या मार्गदर्शनानुसार ही निवडणूक बिनविरोध करण्यात यश आले.
नवजीवन विकास सोसायटी ही गावात एक नामांकित अशी संस्था आहे. या संस्थेवर वर्षानुवर्षे माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या गटाची सत्ता आहे. या संस्थेच्या संचालक मंडळामध्ये सुरेश पाटील यांनी समतोल साधत वेगवेगळ्या गटांना न्याय देण्याचा या निवडणुकीत प्रयत्न केला आहे.
ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी माजी आमदार अमल महाडिक, छत्रपती राजाराम साखर कारखान्याचे चेअरमन दिलीप पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य के.व्ही. पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण, भाजपचे तालुका अध्यक्ष राजेश पाटील आदींचे बहुमोल सहकार्य लाभले.
नूतन संचालक मंडळ पुढील प्रमाणे, सुरेश तात्यासाहेब पाटील, पांडूरंग तावडे, नामदेव करपे, परशराम पाटील, राजाराम चौगुले, शिवाजी चव्हाण, हिम्मत भालदार, शिवाजी उनाळे, बजरंग पोवार, खानू पुजारी, राजू सुतार, भागीरथी दिंडे, रुक्मिणी पाटील आदी.
No comments:
Post a Comment