Thursday, 28 April 2022

मुख्याध्यापकांची सहविचार सभा उत्साहात संपन्न.


कोल्हापूर/ प्रतिनिधी

   लोकराजा राजर्षी छत्रपती  शाहू महाराज  स्मृतिशताब्दी कृतज्ञता महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी व शैक्षणिक वर्ष २०२२ / २३ च्या शैक्षणिक नियोजनासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील खाजगी सर्व व्यवस्थापनाच्या माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांची  माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ  आंबोकर यांचे अध्यक्षतेखाली प.बा.पाटील माध्यमिक विद्यालय मुदाळ येथे  मुख्याध्यापकांची सहविचार सभा उत्साहात संपन्न झाली.
     माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर  यांनी लोकराजा राजर्षि शाहू महाराज स्मृतिशताब्दी कृतज्ञतापूर्वच्या निमित्ताने घेण्यात  येणाऱ्या विज्ञान प्रदर्शन, कथाकथन स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, तसेच ग्रंथप्रदर्शन या संदर्भाने माहिती दिली.तसेच ग्रंथप्रदर्शनास द्यावयाच्या भेटीचे तालुका निहाय नियोजन सांगितले. पुढील शैक्षणिक वर्षाचे नियोजनाच्या अनुषंगाने शाळा सिद्धी स्वच्छ विद्यालय पुरस्कार, विविध पत्रके परिपत्रके, आधार कार्ड अपडेशन, महाराष्ट्र लोकसेवा हक्क, अधिनियम-२०१५ च्या कलम तीन मधील पोटकलम एक अन्वये लोकसेवा घोषित करणे याचे मार्गदर्शन केले. शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय परीक्षा, एनटीएस, एनएमएमएस शिष्यवृत्ती संदर्भामध्ये नियोजन करणे यासाठी                    सर्व मुख्याध्यापकांना मार्गदर्शन केले.
    या मुख्याध्यापकांची सहविचार सभेस भुदरगड तालुक्यातून  ५१,  राधानगरी तालुक्यातून ५७ व कागल तालुक्यातून ६५ असे एकूण १७३ शाळांचे मुख्याध्यापक बंधू भगिनी उपस्थित होते.
   जागृती हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज गडहिंग्लज मध्ये मुख्याध्यापकांची सह विचार सभा झाली. या सभेत आजरा तालुक्यातून २९ , गडहिंग्लज तालूक्यातून ५९ तर चंदगड तालुक्यातून ५९ असे एकूण १४७ माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक बंधू भगिनी उपस्थित होते.
     या सहविचार सभे प्रसंगी प्रास्ताविक उपशिक्षणाधिकारी गजानन उकिर्डे यांनी केले.प.स.भूदरगडचे  गटशिक्षणाधिकारी दीपक  मेंगाणे,  उपशिक्षणाधिकारी एस. बी. मानकर विद्यालयाचे मुख्याध्यापक एम. बी. पाटील मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुरेश संकपाळ उपाध्यक्ष मिलिंद पांगिरेकर,मुख्याध्यापक संघाचे  उपाध्यक्ष बी. आर. बुगडे,संचालक प्राचार्य एस. आर. पाटील, एन.बी. पाटील आदी मान्यवरांसह मुख्याध्यापक संघाचे व सर्व शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
     फोटो 
माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर  मुख्याध्यापकांच्या  सहविचार सभेत बोलतांना.

No comments:

Post a Comment