Monday, 18 April 2022

झंवर उद्योग समूहाच्या वतीने जोतिबा यात्रेनिमित्त भाविकांसाठी मोफत बससेवा

हेरले / प्रतिनिधी


शिरोली औद्योगिक वसाहतीमधील झंवर उद्योग समूहाच्या वतीने जोतिबा यात्रेनिमित्त भाविकांसाठी मोफत बससेवा, चिक्की व सरबत वाटप असा उपक्रम राबविण्यात आला. मोफत बससेवेचे उद्घाटन झंवर उद्योग समूहाचे संचालक निरज झंवर यांच्या हस्ते करण्यात आले. 
झंवर उद्योग समूहाच्या वतीने कंपनीच्या कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सीब्लिटी योजनेतून प्रती वर्षी हा उपक्रम राबविण्यात येतो. जोतिबा यात्रेनिमित्त कर्नाटक व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. वाहतूकीअभावी त्यांची गैरसोय होवू नये म्हणून कंपनीच्या वतीने पाच खासगी प्रवासी बसची दिवसभर मोफत सेवा सुरू होती. बसमधून प्रवास करणाऱ्या भाविकांना चिक्की व सरबत वाटप करण्यात आले.  कंपनीच्या कर्मचाऱ्यांमार्फत संपूर्ण दिवस सरबत वाटप करण्यात आले. 
यावेळी झंवर उद्योग समूहाचे संचालक निरज झंवर,  रोहन झंवर,  सौ. जिया झंवर, सौ. अंकिता झंवर, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आदी उपस्थित होते. 
..............................
फोटो
पुलाची शिरोली, कोल्हापूर येथे मोफत बससेवेचे उद्घाटन करताना झंवर उद्योग समूहाचे संचालक निरज झंवर, रोहन झंवर, सौ.जिया झंवर, सौ. अंकिता झंवर आदी.
............................................................................................

No comments:

Post a Comment