हेरले / प्रतिनिधी
हातकणंगले तालुक्यातील हेरले येथे गुरुवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसामुळे शेतकरी दादासो कोळेकर यांच्या केळीच्या बागेचे ग्रीन हाऊसचे व ढब्बू मिरची पिकाचे असे पंधरा लाखा पर्यंतचे प्रचंड नुकसान झाले.
हेरलेतील दादासो कोळेकर यांचे ग्रीन हाऊस आहे.या ग्रीन हाऊसमध्ये रंगीत ढोबळी ( colour capsicum) मिरची हे पिक आहे. गुरुवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसामध्ये पिकाचे व ग्रीन हाऊस चे प्रचंड नुकसान झाले आहे.
रंगीत ढोबळी मिरची साठी लावणी पासून आतापर्यंत १ लाख २५ हजार रुपये खर्च आला आहे. या पिकाचे उत्पादन सुरु झाले होते. अंदाजे ४ ते ५ लाख रुपयांचे उत्पादन झाले असते. मात्र वादळी पावसामुळे मिरची पिकाच्या येणाऱ्या ४ ते ५ लाख उत्पादनावर आवकाळी पावसाने पाणी फिरवले.
तसेच ग्रीन हाऊस शेडचे संपूर्ण प्लास्टिक आच्छादन फाटले व मेटल स्ट्रक्टचर बेंड झाले असून त्यामुळे आंदाजे ५ ते ६ लाखाचे नुकसान झाले आहे. ढोबळी मिरची व ग्रीन हाऊस शेडचे मिळून १० ते १२ लाखाचे नुकसान आहे. तसेच केळीची बागेचे व ग्रीन हाऊसचे मिळून आडीच लाख ते तीन लाखाचे नुकसान झाले आहे. असे एकूण अंदाजे पंधरा लाखाचे नुकसान झाले असल्याचे शेतकरी दादासो कोळेकर यांनी पत्रकारांना सांगितले.
हेरलेचे तलाठी एस.ए. बरगाले, कोतवाल महंमद जमादार यांनी गुरुवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसाने केलेल्या नुकसानीचा पंचनामा शुक्रवारी करून शासनाकडून शेतकऱ्यास नुकसान भरपाई मिळणेसाठी पुढील कार्यवाहीसाठी अहवाल पाठविला आहे.
No comments:
Post a Comment