हेरले / प्रतिनिधी
राजकारण करत असताना राजकारणात विकासाची स्पर्धा असावी व मिळालेला निधी योग्य पद्धतीने वापरला तरच विकास दिसून येणार आहे.
आपल्या मतदार संघातील गावांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी विकासाचा रचनात्मक आराखडा प्रत्येक भागातील कार्यकर्त्यांशी चर्चा करून मुख्यमंत्र्यांसमोर एक प्लॅन ठेवला असल्याचे सांगितले यावेळी त्यांनी रुकडी चे सरपंच रफिक कलावंत यांच्या कामाचे विशेष कौतुक केले.
यावेळी हातकणंगलेचे आमदार राजू बाबा आवळे यांनी हातकणगले तालुका काँग्रेसचे अध्यक्ष भगवान जाधव हे काँग्रेस चे निष्ठावंत कार्यकर्ते असल्याने त्यांच्या मागणीवरून रुकडीतील सर्व विकासकामांना मदत केली असल्याचे सांगितले. कोणताही समाज विकासापासून वंचित राहणार नसल्याचे त्यांनी या वेळी सांगितले तसेच तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेतून १७ हजार लाभार्थ्यांना पेन्शन मिळवून दिल्याचे सांगितले.
ते रूकडी (ता. हातकणंगले) येथील त्यांच्या फंडातून १ कोटी ७२ लाख रुपये च्या विविध विकास कामाचा लोकार्पण व शुभारंभ सोहळ्यात बोलत होते.
प्रस्ताविक हातकणंगले तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भगवान जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन विलास गायकवड यांनी मानले. या प्रसंगी सरपंच रफिक कलावंत ,उपसरपंच रणजित कदम सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
खासदार धैर्यशील माने यांनी रुकडीचे सरपंच रफिक कलावंत यांचे काम जिल्ह्यात कौतुकास्पद असून त्यांनी वेळ प्रसंगी गावातील स्वछतेसाठी व पाणी पुरवठ्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून काम केल्याचे कौतूक केले.
No comments:
Post a Comment