हेरले /प्रतिनिधी
हातकणंगले तालुक्यातील हेरले येथे संयुक्त शिवजयंती समितीच्या वतीने आयोजित शिवजयंती महोत्सवास १ मे रोजी पासून सुरुवात झाली आहे.१ मे ते ६ मे पर्यंत शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. ५ मे रोजी ख्यातनाम व्याख्याते प्रा.नितीन बानुगडे पाटील यांचे व्याख्यान सायंकाळी ७ वाजता झेंडा चौकात आयोजित केले आहे.
हेरले गावांमध्ये शिवसेना, जयहिंद तरुण मंडळ, सूर्यगंगा तरुण मंडळ, जयकिर्ती तरुण मंडळ, शिवप्रेमी तरुण मंडळ, जयविजय तरुण मंडळ, संग्राम तरुण मंडळ, रत्नदिप तरुण मंडळ, रवी पाटील वसाहत, ओन्ली यू तरुण मंडळ,चौगुले ग्रुप तळ्याची गल्ली, कॉर्नर बॉइज तरुण मंडळ,जय विजय मित्र मंडळ माळभाग, हावलदार ग्रुप चौगुले गल्ली, भगवा रक्षक माळभाग, कोरवी ग्रुप आदीसह अन्य तरुण मंडळांनी आपआपल्या कॉलनीच्या चौकात आरास करून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन केले. परिसरात रांगोळी घालून, भगव्या पताका, भगवे ध्वज, स्फूर्तिदायी पोवाडे लावून वातावरणनिर्मिती केली.
सोमवारी सकाळी ८.३० वाजता गावातील सर्व उपनगरांमध्ये तरुण मंडळांच्या वतीने पन्हाळा येथून आणलेल्या शिवज्योतीचे पूजन करून मोटर सायकल रॅली काढली.
सायंकाळी शिवजन्मकाळ सोहळा व पालखी सोहळा पाळणागीतांसह शिवशाहिरांचे पोवाडे, रणहालगीचा ठेका, दांडपट्टा, पारंपरिक वेशभूषेतील बालचमूंचा,महिला, तरुण,वृद्धासह उत्साह आणि शिवछत्रपतींचा अखंड जयघोष अशा उत्साही वातावरणात संपन्न झाली. या प्रसंगी पोलिस पाटील नयन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिवजयंतीची पारंपारिक मिरवणूकीत महालक्ष्मी ढोल कोल्हापूर व गावातील महिला व पुरुष यांनी झांजपथकामध्ये उत्साहात सहभाग घेतल्याने मिरवणूक शिवमय संपन्न झाली.कॉर्नर बॉइज तरुण मंडळ याच्या वतीने माळभागावर महाप्रसादाचे आयोजन केले. रुषीकेश लाड यांनी सकाळी सर्व शिवभक्तांना झेंडा चौकामध्ये अल्पोहार वाटप केला. अशा उत्साही वातावरणात सोमवारी पारंपरिक शिवजयंती उत्साहात साजरी झाली.
१ मे रोजी सकाळी आकाशदीप नेत्रालय मिरज यांचा वतीने नेत्र तपासणी शिबीर संपन्न झाले. या शिबीरात १०० रुग्णांनी लाभ घेतला. सांयकाळी शिवचरित्र विषयावर व्याख्यान सुनिल लाड कौलापूर सांगली यांचे संपन्न झाले.
५ मे रोजी ख्यातनाम व्याख्याते प्रा.नितीन बानुगडे पाटील यांचे व्याख्यान सायंकाळी ७ वाजता झेंडा चौकात आयोजित केले आहे.६ मे रोजी सायंकाळी शिवजयंती भव्य मिरवणूक होणार आहे.
या संयुक्त शिवजंयती महोत्सवाचे
आयोजन नंदकुमार माने, कपिल भोसले, विजय भोसले, संदीप शेटे, रविराज माने, उदय भोसले, विनोद वडु, अमर वडु, राहूल काटकर, प्रकाश वडु ,सोमनाथ भोसले,चेतन खांडेकर, सचिन डोर्ले, मंदार गडकरी, शरद माने, सुनिल मोहिते, महेश सावंत, निरंजन खांडेकर, विनोद माने,संदिप थोरात,विजय कारंडे, संतोष भोसले,सग्राम रुईकर, रुषीकेश लाड, मंदार मिरजे, सचिन जाधव, मनोज जाधव, विश्वेश्वर रुईकर, विश्वजीत भोसले आदींसह गावातील सर्व तरुण मंडळांच्या शिवभक्तांनी संयोजन केले आहे.
फोटो
हेरले : सोमवारी शिवजयंती दिनी सायंकाळी शिवजन्मकाळ सोहळा प्रसंगी महिला पाळणागीत म्हणतांना.
No comments:
Post a Comment