हेरले /प्रतिनिधी
पेठ वडगांव(ता.हातकणगंले) येथील मोहन शिंदे यांना बंडखोर सेनापक्ष व बंडखोर मिडिया ग्रूप आयोजित बंडखोर सेना पक्षाचा 9 वा तर लढवय्या महाराष्ट्र न्युजचा दुसऱ्या वर्धापणदिन निमित्त "युथ आयकाँन हा "पुरस्कार देण्यात आला.
जिवनात विविध क्षेत्रातील राजकीय, सामाजिक , शैक्षणिक, वा इतर सर्वच क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमठविणाऱ्या अनेक युवक युवतींना 2022 चा "युथ आयकाँन" हा मानाचा पुरस्कार आमदार राजूबाबा आवळे यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.
जिल्हाध्यक्ष मोहन शिंदे यांनी भारतीय मराठा महासंघाच्या माध्यमातून आजपर्यंत केलेल्या सामाजिक व उल्लेखनीय कामगिरी बद्दल याची दखल घेऊन त्यांना बंडखोर मिडिया ग्रूप वतीने 2022 चा "युथ आयकाँन" हा मानाचा पुरस्कार त्यांना गुरुवार दि. 01 मे महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन या दिवशी हातकणगंले विधानसभेचे आमदार राजूबाबा आवळे यांच्या शुभ हस्ते सन्मानपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
यावेळी भटका समाज मुक्ती आंदोलन अध्यक्ष भिमराव साठे बापू , कुमारी स्वराली शिंदे , बंडखोर मिडिया ग्रूप अध्यक्ष शिवाजीराव आवळे, नगरसेविका नम्रता ताइगडे, मा.उपनगराध्यक्षा प्रविता सालपे , शिवानी आवळे , अभिनेत्री श्री मेसवाल मँडम आणि अश्विनी इरोळे,
एनएसजी कमांडो मुकूंद वासुदेव, प्रसिद्ध निवेदक , कवी कृष्णात बसागरे (सर) बंडखोर सेना पक्षाचे व मिडिया ग्रूपचे पदाधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment