हेरले /प्रतिनिधी
छत्रपती शाहू महाराज यांच्या 100 व्या पुण्यतिथीनिमित्त जिल्हा प्रशासन कोल्हापूर आयोजित वंदन लोकराजा 6 मे 2022 रोजी सकाळी 10 वाजता 100 सेकंद स्तब्धता पाळुन आदरांजली वाहण्याचा तसेच विविध कार्यक्रमा आयोजित करण्यात आले होते 9 वर्षीय भारतभूषण डॉक्टर केदार विजय साळुंखे यांनी शाहू महाराजांची वेशभूषा करून 1 तास लॉग स्केटिंग केले. त्याचा राष्ट्रीय रेकॉर्ड बुकमध्ये नोंद झालेबाबत चा विक्रम आज माननीय जिल्हाधिकारी कोल्हापूर श्री राहुल रेखावार यांनी घोषित करून त्यांचा सत्कार केला. सदरवेळी स्केटींग कोच सचिन इंगवले यांचा तसेच हर्षल सावंत नक्षत्र रियल इस्टेट व डेव्हलपर्स सांगली यांचा विशेष सत्कार करण्यात आला.डाॅ.केदार साळुंखे यांने अवघ्या सातव्या वर्षी सायकलिगमध्ये एकाच बुकमध्ये एका वेळी चार रेकॉर्ड करणारा पहिला भारतीय ठरला. आतापर्यंत स्केटींग व सायकलिंगमध्ये 18 विश्वविक्रम नोंदवले आहेत.डाॅ. केदार यास वयाच्या सातव्या वर्षी 'डॉक्टरेट इन ॲथलेटिक्स ' ही पदवी देऊन द दायसेस ऑफ अशिया चेन्नई तामिळनाडू सन्मानित केले असून मेजर ध्यानंचद राष्ट्रीय खेळाडू पुरस्कार ही मिळाला आहे.नुकतेच त्याला अटल युथ अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले आहे.
डाॅ.केदार साळुंखे याला विबग्याेर स्कुल च्या प्राचार्या स्नेहल नावेॅकर, प्रशिक्षक सचिन इगंवले, स्वप्निल काेळी, वडिल विजय साळूंखे व आई स्वाती गायकवाड साळूंखे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
No comments:
Post a Comment