Thursday, 2 June 2022

मौजे वडगाव श्रीदत्त सोसायटीच्या चेअरमनपदी नीता वाकरेकर तर व्हा. चेअरमनपदी महालिंग जंगम


हेरले /प्रतिनिधी 
मौजे वडगाव (ता.हातकणंगले) येथील श्री दत्त विकास सेवा संस्थेच्या चेअरमनपदी नीता वाकरेकर यांची तर व्हा. चेअरमनपदी महालिंग जंगम यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला .
         प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक माजी उपसरपंच सुरेश कांबरे यांनी केले. यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .यावेळी बोलताना नूतन चेअरमन नीता वाकरेकर म्हणाल्या की, सर्व संचालकांना विश्वासात घेऊन संस्थेचा कारभार पारदर्शक करणार आहे. तसेच कोल्हापूर या शाहूमहाराजांच्या जिल्ह्यामध्ये  व मौजे वडगाव च्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला प्रथम चेअरमन होण्याचा मान दिल्याबद्दल कोअर कमिटीचे सदैव ऋणी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले .यावेळी संचालक मंडळ  एड .विजय चौगुले, विलास सावंत, शिवाजी जाधव, मधुकर अकीवाटे, दीपक थोरवत ,रामचंद्र चौगुले, जमीर पटेल, बापू शेटे, प्रकाश कांबळे, अंबाजी कोळेकर, दीपा सावंत, यांच्यासह कोअर कमिटी सदस्य माजी सरपंच सतीशकुमार चौगुले, शिवसेनेचे सुरेश कांबरे, विजय चौगुले ,सामाजिक कार्यकर्ते सुनील खारेपाटणे, ग्रा.पं. सदस्य अविनाश पाटील, सतीश वाकरेकर, आनंदा थोरवत, स्वप्नील चौगुले, अमोल झांबरे, उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून हातकणंगले उपनिबंधक डॉ. प्रगती बागल, मकसूद सिंधी, सचिव पोपट बेडेकर, यांनी काम पाहिले आभार माजी सरपंच सतीशकुमार चौगुले यांनी मानले.

No comments:

Post a Comment