कोल्हापूर / प्रतिनिधी
श्रीमती महाराणी ताराबाई शासकीय अध्यापक महाविद्यालय (बी टी कॉलेज) या महाविद्यालयास ८८ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त १९३४ ते २०२२ या काळातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. मेळाव्यास एकूण १७० माजी विद्यार्थी उपस्थित होते. प्रत्येक बॅचचे माजी विद्यार्थी दीर्घ कालावधीनंतर भेटले. वृध्दत्व गाठलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी हितगुज करत आपल्या आठवणींना उजाळा दिला.
येथील प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलच्या गडकरी सभागृहामध्ये हा स्नेहमेळावा संपन्न झाला.
यावेळी प्रथम दिप प्रज्वलन व श्री महाराणी ताराबाईच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पुजन करण्यात आले. बी.एड. प्रथम वर्षाच्या छात्राध्यापकांनी स्वागतगीत सादर केले.
आपल्या स्वागत आणि प्रास्ताविकात माजी विद्यार्थी मंडळाचे समन्वयक डॉ. सर्जेराव चव्हाण यांनी या मेळाव्याचा उद्देश स्पष्ट करून प्रमुख मार्गदर्शक डॉ. बी. एम. हिर्डेकर यांचा परिचय करून दिला.
याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक डॉ. बी.एम.हिर्डेकर,डॉ.पी.एस.पाटणकर, माजी प्राचार्य डॉ.एस.बी.कांबळे,डॉ. एम.एन.हंडाळ, अशोक जाधव, एस.के.देसाई, प्रभाकर हेरवाडे,बोराडे यांचा सत्कार करण्यात आला.
अरविंद देशपांडे लिखित सृजनाची स्वप्न जागवताना या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
महाविदयालयामध्ये प्रथम क्रमांक आलेल्या बी.एड.विदयार्थीनींना मान्यवरांच्या हस्ते भागिरथी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी डॉ.पी.एस.पाटणकर,डॉ.एल.एस.पाटील,डॉ.एस.बी.कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रमुख मार्गदर्शक डॉ. बी. एम. हिर्डेकर यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- २०२० याविषयी मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. सी.वाय. कांबळे यांनी माजी विदयार्थी मंडळ स्थापन करण्याचा उददेश स्पष्ट करून महाविद्यालयात वर्षातून तीन उपक्रम माजी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत होतील. असे त्यांने सांगितले.
माजी विदयार्थी प्रभाकर हेरवाडे यांनी आभार मानले. माजी विदयार्थीनी श्रीमती पी.एन. कुलकर्णी यांनी पसायदान सादर केले.माजी विदयार्थी मंडळाचे समन्वयक डॉ.सर्जेराव चव्हाण व प्रभाकर हेरवाडे यांनी माजी विदयार्थी कार्यकारी मंडळाची स्थापनाकेली.यावेळीप्रा.डॉ.ए.बी.साळी,डॉ.एल.एस.पाटील,प्रा.जी.एम.माने, एस.ए.मोहिते, बी. जी. बोराडे आदी मान्यवरांसह विविध कार्यालयीन कर्मचाऱ्यांसह माजी विद्यार्थी उपस्थित होते.
फोटो
माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्यात दीप प्रज्वलन आणि फो हेटो पूजन प्रसंगी प्राचार्य डॉ.सी वाय.कांबळे, डॉ.बी.एम. हिर्डेकर, डॉ. सर्जेराव चव्हाण, प्रभाकर हेरवाडे व इतर मान्यवर.
Congratulations.It's a great achievement
ReplyDeleteDr. Masarrat Saheb Ali