Friday, 1 July 2022

मौजे वडगाव येथून पायी दिंडीचे पंढरपूर कडे प्रस्थान


 हेरले (प्रतिनिधी) 

मौजे वडगाव( ता. हातकणंगले) येथून ह. भ. प .प्रकाश वाकरेकर ( महाराज ) यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढी एकादशी निमित्त मौजे वडगाव व संभापूर येथील वारकरी संप्रदायातील बांधवांनी श्रीक्षेत्र पंढरपूर कडे प्रस्थान केले .गावातील मुख्य रस्त्यावरून टाळ व मृदंगाच्या गजरात  विठ्ठल रखूमाई मारुती मंदिरात एकत्र जमा होऊन गावातील मान्यवर व भाविकांच्याकडून निरोप देण्यात आला. यावेळी दिंडी चालक प्रकाश वाकरेकर म्हणाले, की मौजे वडगाव व संभापूर या दोन्ही गावातील मिळून शंभर हून अधिक वारकऱ्यांनी या दिंडी सोहळ्यात सहभाग घेतला आहे. या दिंडी सोहळ्याचे यंदाचे आठवे वर्ष असून प्रत्येक वर्षी दिंडीतील वारकऱ्यांची संख्या वाढत आहे.
            यावेळी दिंडी चालक ह. भ. प. प्रकाश वाकरेकर (महाराज) आण्‍णासो  थोरवत, तुकाराम झांबरे, बबन सावंत ,मालन गरड, कल्पना लोखंडे, संगीता तेली, तर संभापूर येथील अरविंद जाधव, अशोक झिरंगे, नितीन मोहिते, प्रवीण मेथे, यांच्या यांच्यासह वारकरी संप्रदायातील भजनी मंडळ व भक्त मंडळी हजर होते.

No comments:

Post a Comment