हेरले प्रतिनिधी
सह्याद्री एज्युकेशन सोसायटी अंबप संचलित छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन व जुनिअर कॉलेज पेठ वडगाव आणि दिशा इंग्लिश मीडियम स्कूल पेठ वडगाव या प्रशालेत गुरु पौर्णिमेचा कार्यक्रम उत्साहात पार पडला या कार्यक्रमासाठी जयवंत खाडे माजी पोलीस उपनिरीक्षक, प्रा. प्रदीप तोडकर संचालक वारणा सहकारी साखर कारखाना प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व प्रशालेचे मुख्याध्यापक राजेंद्र माने यांनी भूषविले आणि संस्था उपाध्यक्ष प्रदीप दरवान संस्था खजनिस बापूसो माने इत्यादी मान्यवर मंडळी उपस्थित होती सुरुवातीला गुरुवंदना होऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली त्याचबरोबर प्रशालेत आलेल्या मान्यवर पाहुण्यांचे स्वागत ,सत्कार राजेंद्र माने यांच्या हस्ते करण्यात आले तसेच इतर मान्यवरांचा देखील सत्कार करण्यात आला त्यानंतर विद्यार्थी व विद्यार्थिनी मनोगते झाली या मनोगतानंतर प्रमुख पाहुणे जयवंत खाडे यांनी आपल्या मनोगतामध्ये आई-वडील हेच आपले खरे गुरु आहेत असे सांगत गुरूचे महत्व विशद केले तसेच प्राध्यापक तोडकर यांनी गुरू परंपरा सांगून माणसांच्या जीवनात गुरुचे महत्त्व सांगितले व परिस्थिती ही गुरु आहे असे मत मांडले त्यानंतर अध्यक्षीय मनोगतामध्ये राजेंद्र माने यांनी भारतीय प्राचीन गुरुपरंपरा व मानवी जीवनातील गुरुचे महत्त्व सांगून आपल्या जीवनातील काही प्रसंग सांगत मुलांना मंत्रमुग्ध केले या कार्यक्रमासाठी प्रशालेचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, सर्व विभाग प्रमुख ,शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सासणे एस जे यांनी केले तर सूत्रसंचालन एम आर पाटील यांनी केले तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कांबळे एस बी यांनी मानले
No comments:
Post a Comment