हेरले / प्रतिनिधी
महाराष्ट्र कबड्डी संघाच्या प्रातिनिधिक संघात संजय घोडावत उद्योग समूहाच्या कबड्डी संघाचे खेळाडू श्री शंकर गदई व श्री राहुल खाटीक यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली. श्री शंकर गदई यांच्यावर महाराष्ट्र संघाची कर्णधार पदाची धुरा सोपवण्यात आलेली आहे ही बाब इतिहासात प्रथमच घडली आहे. यामागील कारण त्याच्या कुशल नेतृत्वाखाली अहमदनगर जिल्ह्याने 69 व्या राज्य अजिंक्यपद पटकावले होते. यासाठी संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त श्री विनायक भोसले, कुलगुरू डॉ. अरुण पाटील, प्राचार्य श्री विराट गिरी व विद्यापीठ प्रशिक्षक श्री महेश गावडे यांचे वेळोवेळी या खेळाडूंना प्रोत्साहन व मार्गदर्शन मिळत असते. सदर खेळाडूंचे घोडावत ग्रुपचे चेअरमन मा श्री संजयजी घोडावत व श्रेणिकजी घोडावत यांनी ही विशेष अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत. इतिहासात महाराष्ट्रमध्ये प्रथमच एकाच संजय घोडावत उद्योग समूहाचे एवढ्या मोठ्या संख्येने खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेत प्रतिनिधित्व करीत आहेत यावरून हे सिद्ध होते की घोडावत उद्योग समूह क्रिडा क्षेत्राला किती महत्त्व व प्रोत्साहन देत आहे.
No comments:
Post a Comment