हेरले /प्रतिनिधी
पदभार स्विकारणे म्हणजे सगळं होत नसतं तर कार्यभार हा तितकाच महत्वाचा असतो त्यामुळे तो प्रामाणिक पणे उचलला पाहीजे. जितक्या प्रामाणिक पणे काम कराल तितक्या प्रामाणिक पणे दुसऱ्याच्या मनापर्यंत पोहचत असते हे मला माहित आहे . म्हणून मी माझं काम प्रामाणिक पणे करत राहते असे उदगार जि.प.च्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी काढले त्या मौजे वडगाव (ता. हातकणंगले) येथे जि .प . फंडातून झालेला विकास कामाच्या उदघाटन व पाण्याचा टँकर च्या लोकार्पण सोहळा प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या . कार्यकमाच्या अध्यक्षस्थानी श्रीकांत सावंत होते . तर प्रमुख उपस्थितीत रावसो चौगुले व सरपंच काशीनाथ कांबळे होते .
त्या पुढे म्हणाल्या की, मी जो पाण्याचा टॅकर दिला आहे. त्याच्या मागे एक उदात्त हेतू आहे की ज्यावेळी कोल्हापुरात महापूर आला व चौहोकडे पाणीच पाणी होते पण माणसांना पिण्यासाठी पाणी नव्हते त्यासाठी आपण काहीतरी व्यवस्था केली पाहीजे पण ती ग्रामपंचायतीच्या हक्काची असवी त्यामुळे माझ्या मतदार संघामध्ये पाच गावे येतात त्या प्रत्येक गावात पाण्याच्या टँकरची व्यवस्था केली आहे.
माझ्या मतदार संघातील प्रत्येक गावातील ग्रामस्थ माझ्या सोबत राहून मला मतदान केले . त्यामुळे मी तुमच्या मतावर जि.प मतदार संघाचे नव्हे तर जि .प .चे अध्यक्ष होऊन नेतृत्व करण्याची संधी दिली आहे . त्यामुळे भविष्यात मी पदावर असो वा नसो पण आपल्या मुलभूत गरजा भागविण्यासाठी तत्पर असेन . यावेळी जि.प शाळेतील खोली , प्राथमिक आरोग्य केंद्रातील खोली , मातंग समाज येथील आरसीसी गटर्स' व रस्ता , इत्यादी कामाचे उदघाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच गावासाठी कोट्यावधीची कामे करून वचनपूर्ती केलाचे समाधान वाटत आहे असेही त्या यावेळी म्हणाल्या . यावेळी माजी सरपंच सतिशकुमार चौगुले , . सविता सावंत , . अविनाश पाटील ,यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी अँड विजयकुमार चौगुले , सुनिल खारेपाटणे ,सतिश वाकरेकर ' माजी पोलिसपाटील मनोहर चौगले , आनंदा थोरवत , सुरेश कांबरे ' दादू अतिग्रे ,अमोल झाबरे , भूपाल कांबळे , पवन जाधव , माधूरी सावंत सरिता यादव , मायावती तराळ , आश्विनी लोंढे , यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .स्वागत व प्रास्ताविक प्रदिप लोहर यांनी केले. तर आभार स्वप्नील चौगुले यांनी मानले .
फोटो
शौमिका महाडिक यांच्या निधीतून पाण्याच्या टँकरचा लोकार्पण सोहळा प्रसंगी गावातील मान्यवर
No comments:
Post a Comment