नरंदे विद्यालयात शिवाजीराव देशमुख व्याख्यानमाला
हातकणंगले प्रतिनिधी
"प्रत्येक विद्यार्थ्याला यशस्वी होण्याचा हक्क आहे. त्यासाठी कठोर परिश्रम,प्रयत्नातील सातत्य, चिकाटी आणि आत्मविश्वास या चतुःसुत्रीचा वापर केला पाहिजे. स्वतःच्या क्षमता ओळखून आपण प्रयत्नशील राहिले पाहिजे. आळस आणि कामचुकारपणा हे विद्यार्थी जीवनात नेहमीच शत्रू आहेत, हे समजून सक्रिय झाले पाहिजे. " असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक जीवन साळोखे यांनी केले.
ते स्व.शिवाजीराव देशमुख व्याख्यानमालेत,नागनाथ शिक्षण संस्थेच्या नरंदे हायस्कूल नरंदे (ता.हातकणंगले ) येथे "यशस्वी होण्याचा राजमार्ग" या विषयावर बोलत होते. यावेळी संस्थेच्या सेक्रेटरी नमिता देशमुख या अध्यक्षस्थानी होत्या.
आपल्या भाषणात जीवन साळोखे पुढे म्हणाले,विद्यार्थी जीवनापासून यशस्वी होण्यासाठी ध्येय प्राप्तीचा ध्यास घेतला पाहिजे. योग्य दिशेने,सकारात्मक द्रुष्ट्या सतत प्रयत्न आणि परीश्रम केले तर , अशक्य काहीच नाही. तुमच्यातील
कार्यक्षमता आणि गुणवत्ता या तुम्हाला वेळोवेळी कसोटीवर सिद्ध केल्या पाहिजेत. त्या बढाई मारण्याच्या गोष्टी नाहीत."
यावेळी आपल्या भाषणात वाचनाचे महत्त्व विशद करून विद्यार्थ्यांनी वाचते होण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करण्याचे आवाहन करून, प्राचार्य जीवन साळोखे यांनी आपल्या "ग्रंथदान उपक्रमांतर्गत" हायस्कूलच्या शालेय ग्रंथालयास पंधराशे रु.ची पुस्तके भेट दिली.
प्रारंभी पर्यवेक्षिका सौ.एस.एस.निकम यांनी स्वागत, मुख्याध्यापक बी.एस,खोत यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून दिला.
सुस्मिता शिंदे यांनी सूत्रसंचालन तर सुरेश गावडे यांनी समारोप केला.
◆◆
No comments:
Post a Comment