Monday, 17 October 2022

आपत्ती व्यवस्थापनाचे शिक्षण काळाची गरज: जिल्हाधिकारी रेखावारसंजय घोडावत विद्यापीठात आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन


हेरले प्रतिनिधी

 कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत सरकार महत्त्वाची भूमिका बजावत असते. या काळात नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश आपत्कालीन विभागाकडून देण्यात येतात. नागरिकांना अशा परिस्थितीत काय करावे कळत नाही. या काळात मानव, प्राणी यांचे जीव वाचवणे गरजेचे असते. परंतु प्रशिक्षित कर्मचारी, अधिकारी यांची तुलनेने संख्या कमी असल्यामुळे व या विषयाचे शिक्षण नसल्यामुळे मर्यादा येतात. यासाठी आपत्कालीन व्यवस्थापनाचे शिक्षण ही काळाची गरज आहे. पदवी आणि पदव्युत्तर विभागात हे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळाल्यास नागरिकांचा जीव वाचण्यास नक्कीच मदत होईल, असे मत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी संजय घोडावत विद्यापीठातील आपत्कालीन व्यवस्थापन या विषयावरील आंतरराष्ट्रीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी मांडले.
डिझास्टर रेसिलियंट इन्फ्रास्ट्रक्चर या थीमवर ब्रिटिश कौन्सिलच्या जागतिक सहभागी स्तरावर देण्यात येणाऱ्या अनुदानाचा भाग म्हणून टीसाईड विद्यापीठ युके, संजय घोडावत विद्यापीठ,एस.आर.एम इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी तमिळनाडू आणि अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने घोडावत विद्यापीठात आपत्ती व्यवस्थापन या विषयावरील आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन प्रमुख पाहुणे जिल्हाधिकारी राहुल रेखावार, टीसाईड विद्यापीठचे आंतरराष्ट्रीय सहयोगी अधिव्याख्याते डॉ. सायमन लिंच, डॉ.केविन थॉमस, एस.आर.एम.विद्यापीठाचे डॉ.विघ्नेश के.एस, घोडावत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.अरुण पाटील, कार्यक्रमाचे अध्यक्ष विश्वस्त विनायक भोसले यांच्या हस्ते झाले.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले, कि आपत्कालीन काळात कोणाचाही जीव वाचवणे खूप गरजेचे असते. यासाठी सार्वांकडून प्रयत्न होणे गरजेचे आहे. या पाच दिवसीय कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्वांनी या विषयाचे उत्तम शिक्षण घेण्यासाठी तयार व्हावे. तुम्ही एका चंगल्या कार्यशाळेत सहभाग घेतल्याचे सांगत, समाधान व्यक्त केले. कोल्हापूर जिल्ह्याविषयी सांगताना ते म्हणाले, कि हा जिल्हा देशालील सर्व राज्यात एक समृद्ध जिल्हा आहे.परंतु येथे काही वार्षापासून आपत्कालीन परिस्थिती उद्भवत आहे. यावर मात करण्यासाठी अशा प्रकारच्या कार्यशाळा आणि शिक्षण गरजेचे आहे. यासाठी अनुदान देणाऱ्या ब्रिटीश कौन्सिल चे आणि यासाठी पुढाकार घेणाऱ्या विद्यापिठांचे त्यंनी कौतुक केले.
     कार्यक्रमाच्या सुरुवातीला घोडावत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.अरुण पाटील यांनी उपस्थित सर्व अतिथी मार्गदर्शकांचे, सहभागी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी बोलताना त्यांनी कार्यशाळेच्या उद्देशाविषयी संगितले. याचा उद्देश 'प्रशिक्षकांना प्रशिक्षित करा' असा असून, या माध्यमातून टीसाईड विद्यापीठ युके येथे शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना, सहभागी शिक्षकांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.
टीसाईड विद्यापीठाचे आंतरराष्ट्रीय सहयोगी अधिव्याख्याते डॉ.सायमन लिंच याप्रसंगी बोलताना म्हणाले, कि मागील वर्षापासून या कार्यशाळेसाठी आमचे प्रयत्न सुरु होते. ब्रिटिश कौन्सिल व घोडावत विद्यापीठाने यासाठी पुढाकार घेतल्याने हि कार्यशाळा पार पडत असल्याचे समाधान व्यक्त केले. जर सहभागी विद्यापीठांनी या संधीचा चांगल्याप्रकारे फायदा करून घेतला तर येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांच्या करियरसाठी याचा नक्कीच उपयोग होईल.
कार्यक्रमाचे अध्यक्ष विश्वस्त विनायक भोसले यांनी हवामान बदलामुळे आपत्कालीन परिस्थितीचे प्रमाण वाढल्याबद्दल चिंता व्यक्त केली. यातून बचाव करण्यासाठी अशा प्रकारच्या शिक्षणाची गरज आहे. यासाठी लागणाऱ्या पायाभूत सोयी सुविधा देण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाताना नागरिकांची मानसिकता बदलणे गरजेचे असल्याचे सांगत संजय घोडावत फौंडेशनन व विद्यापीठाने आपत्कालीन परिस्थितीत केलेल्या सामाजिक कार्याची सर्वाना ओळख करून दिली. लोकांनी आपल्याला नेहमी चांगल्या कार्यासाठी लक्षात ठेवायला हवे असे कार्य विद्यार्थ्यांनी करावे असा उपदेश दिला.
या कार्यशाळेसाठी महत्वाचा दूवा म्हणून कार्य करणारे शैक्षणिक सल्लागार आनंद हंदूर व कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी ब्रिटिश हाय कमिशन गव्हर्मेंट ऑफ युके चे शौभीक गांगुली, घोडावत विद्यापीठातील सर्व अधिव्याख्याते, ६० हून अधिक प्रशिक्षणार्थी, शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सोहम तिवडे यांनी मानले.

No comments:

Post a Comment