हेरले /प्रतिनिधी
सद्गुरु निरंजन महाराज आश्रम, मौजे वडगांव यांच्या वतीने गुरुवार दि. १५ डिसेंबर रोजी श्री सद्गुरु निरंजन महाराज यांच्या २५ वी पुण्यतिथी व शारदामाता जयंती निमित्त आश्रमामध्ये दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहेत.
बुधवार, दि. १४ रोजी सकाळी ९:०० ते १२:०० ज्ञानेश्वरी अध्याय १२. पारायण व चिंतन मार्गदर्शक: ह.भ.प. वेदांताचार्य उदयशास्त्री महाराज, गोटखिंडी
सकाळी १० ते २ मोफत वैद्यकीय शिबीर निदान व मार्गदर्शन (साई कार्डीयाक सेंटर, कोल्हापूर.) रात्री ०८:०० ते ११:०० एकतारी भजन- श्री. दत्तात्रय कुंभार व सहकारी, घालवाड, कोल्हापूर
गुरुवार, दि. १५ रोजी सुर्योदय ७:०६ वा.'श्री' चे पादुकांना अभिषेक
सकाळी ८:०० ते ९:००नोंदणी व चहापान सकाळी ९:०० ते ११:००: भजन श्री भजनी मंडळ, हेरले ,सकाळी ११:०० ते १२:०० प्रवचन: परमार्थभूषण ह.भ.प. श्री. नारायण एकल,
दुपारी १२:०० ते १२:०५ : श्री सद्गुरु निरंजन महाराज पुण्यतिथी सोहळा श्री शारदामाता जयंती : फोटोपूजन व पुष्प अर्पण महाराज, जोगेवाडी.
दुपारी १२:०५ ते ०१:००: प्रवचन: ह.भ.प. श्री. मधुकर पाटील महाराज, कावणे, कोल्हापूर
दुपारी १० ते १:१५ आर्शिवचन गुरुवर्य श्री. शामनाथ बत्ते महाराज, इचलकरंजी -
दुपारी १:१५ ते १:३० सत्कार समारंभ स्वामीभक्त श्री नंदुआण्णा माणगांवकर, शिरोळ,दुपारी १:३० ते ३ महाप्रसाद
दुपारी ०३:०० ते ५:०० भजन : श्रीधर महिला भजनी मंडळ, कोल्हापूर.
यांच्या अमृत हस्ते, ५:०० ते ६:०० प्रवचन: ह.भ.प. श्री. अनंत कुंभार महाराज, बुधगाव, सांगली.
६:०२: सुर्यास्त व आरती
या कार्यक्रमास सद्भक्तांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन श्री सद्गुरु निरंजन महाराज चॅरिटेबल ट्रस्ट, मौजे वडगांव 'ट्रस्टच्या वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
No comments:
Post a Comment