हेरले /प्रतिनिधी
मौजे वडगाव (ता. हातकणंगले) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुनिल खारेपाटणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली . सरपंच कस्तुरी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उपसरपंच निवडणूकीत सुनिल खारेपाटणे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली .
या निवडणूकीत जय शिवराय ग्रामविकास आघाडीने सरपंचसह आठ जागेवर विजय मिळविला होता त्यामुळे जय शिवराय आघाडीचा उपसरंपच होणार हे निश्चित होते . यावेळी उपसरपंच निवडीचे निरिक्षक राहूल कुलकर्णी , ग्रामविकास अधिकारी एस.एम . कांबळे , राहूल सकटे , श्रीकांत सावंत ,रावसाहेब चौगुले , महादेव शिंदे ,बाळासो थोरवत , सतिश चौगुले , धोंडीराम चौगुले, विजय चौगुले, सुरेश कांबरे , आनंदा पोवार, सतिश वाकरेकर , जयवंत चौगुले ,अमोल झांबरे , यांचेसह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते .
No comments:
Post a Comment