*मनपा राजर्षी शाहू विद्यामंदिर क्र .11 येथे बालिका दिन मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात साजरा*
मनपा राजर्षी शाहू विद्यामंदिर क्र .11 कसबा बावडा , कोल्हापूर येथे मंगळवार दि . 3 जानेवारी 2023 रोजी बालिका दिन आणि मोठ्या उत्साहात आणि मंगलमय वातावरणात पार पडला .
सदर कार्यक्रमास प्रभागाच्या माजी नगरसेविका माधुरी लाड मॅडम, शाळा व्यव स्थापन समिती सदस्य निलम पाटोळे,दिपाली चौगले शितल लोंढे उपस्थिती संपन्न झाला.
केंद्रमुख्याध्यापक श्री . डॉ. अजितकुमार भिमराव पाटील यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाबद्दल त्यांनी कशाप्रकारे आपले आयुष्य शिक्षण साठी योगदान दिले हे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले एक स्त्री शिकली तर संपूर्ण घर सुधारते .शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. अज्ञानाची मूळ कारणे शिक्षणआहे ज्ञानानेच समाज सुसंस्कृत बनणार आहे अज्ञान हे दारिद्र्याचे मुख्य कारण आहे त्यासाठी सर्व मुलींनी शिकणे अत्यंत गरजेचे आहे शिक्षणातूनच त्यांचे आरोग्य सुद्धा सुधारणार आहे व यामधून 21व्या शतकाला कणखर असे महिला मिळणार आहेत असे मनोगत व्यक्त केले.
ज्येष्ठ शिक्षक श्री.उत्तम कुंभार , सुशील जाधव, , तांबोळी मॅडम ,विद्या पाटील, तमेजा मुजावर ,बालवाडी मुख्याध्यापिका कल्पना पाटील, सेवक हेमंतकुमार पाटोळे 1 ते 7 चे सर्व विद्यार्थी व पालक वर्ग उपस्थित होते . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मिनाज मुल्ला यांनी केले
प्रास्ताविक डॉ.अजितकुमार पाटील यांनी केले, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांचे स्वागत गुलाब पुष्प देऊन करण्यात आले. मिनाज मुल्ला यांनी नगरसेविका लाड मॅडम यांचे स्वागत केले,विद्या पाटील यांनी दीपाली चौगले,निलम पाटोळे यांचे स्वागत केले, आसमा तांबोळी यांनी शितल लोंढे यांचे स्वागत केले. 1ते 7 काही मुलींनी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा केली होती. बालवाडी पासून सातवीपर्यंतच्या काही विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर, त्यांच्या सामाजिक कार्यावर भाषण केले. आसमा तांबोळी यांनी आभार मानले आणि कार्यक्रमाची सांगता झाली.
No comments:
Post a Comment