Saturday, 18 February 2023

शिवरायांचे गुण आत्मसात केल्यास व्यक्तिमत्व आदर्शवत होईल : माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर


पेठवडगांव / प्रतिनिधी
 जीवनात येणाऱ्या अनेक कठीण प्रसंगातून स्वराज्य निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवरायांचे एखादे गुण आत्मसात केल्यास व्यक्तिमत्व आदर्शवत होईल यात मुळीच शंका नाही.असे प्रतिपादन जिल्हा परिषद कोल्हापूरचे माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी केले. ते आदर्श गुरुकुल विद्यालय पेठ वडगाव येथे गुरुकुल शिवचरित्र पारायण सोहळा याप्रसंगी मार्गदर्शन करताना बोलत होते.

शिक्षणाधिकारी पुढे म्हणाले की येथे येताच हे शिवमय वातावरण पाहून उत्साह निर्माण झाला. "छत्रपती शिवरायांनी अंगीभुत गुणांच्या साह्याने आयुष्यात येणाऱ्या विविध संकटासमोर त्यांनी कधीच हार मानली नाही,तह केला. पण हात मिळवणे कधीच केली नाही. अशा पराक्रमी छत्रपती शिवरायांचे गुण आत्मसात करून विद्यार्थ्यांनी आदर्शवत बनवावे. अशी अपेक्षा व्यक्त केली. 



या उपक्रमाची सुरुवात संपूर्ण महाराष्ट्रात व्हावी शिक्षणाधिकारी

हा शिवचरित्र पारायण सोहळा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. डॉ.दत्तात्रय घुगरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमाची सुरुवात संपूर्ण महाराष्ट्रात व्हावी याकरिता शिक्षण मंत्र्यांकडे केलेल्या उपक्रमाची व्हिडिओ स्वरूपात माहिती पाठवून या उपक्रमाची सुरुवात संपूर्ण महाराष्ट्रातील शाळांमध्ये परिपाठच्या वेळी राबवण्यात येईल काय याविषयी पाठपुरावा करणार आहे.

यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. दत्तात्रय घुगरे व सचिव सौ. महानंदा घुगरे , प्रिस शिवाजी मराठा बोर्डिंग अध्यक्ष बी.जी.बोराडे,उपप्राचार्य एम.ए.परीट, छ.शिवाजी विद्यानिकेतन संस्थापक अध्यक्ष राजेंद्र माने,डॉ. दिपक शेटे,जगदीश कुडाळकर,चंद्रकांत नेर्लेकर, तसेच परिसरातील मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग ,व्यापारी शिक्षण पेठ वडगाव सदस्य, एशियन बुक ऑफ रेकॉर्ड सुनिल पाटील,पश्चिम महाराष्ट्र महिला प्रमुख डॉ. अंजना जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमर इंगवले यांनी केले.

No comments:

Post a Comment