Tuesday, 28 February 2023

नेहरू नगर विद्यालयात डी- मार्ट मार्फत डिजिटल पल्स अँड रीडिंग फेअर उपक्रम उत्साहात संपन्न

कोल्हापूर प्रतिनिधी 
 कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीकडील शाळांमध्ये डी- मार्ट सीएसआरमार्फत अद्यावत संगणक लॅब व लायब्ररी उपक्रम राबवण्यात येत आहेत. सदर उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना संगणकाचे अद्यावत ज्ञान व वाचन क्षमता वाढवण्यासाठी डी- मार्ट चे नेहरूनगर विद्यालय, वीर कक्कय विद्यालय,प्रिन्स शिवाजी विद्यालय, जाधववाडी व लक्ष्मीबाई जरग विद्यालयांमधील शिक्षक व नेहरूनगर विद्यामंदिर चे विद्यार्थी यांनी स्वनिर्मित प्रदर्शनाची मांडणी केली आहे .
सदर प्रदर्शनामध्ये 3D मॉडेल्स,ब्लॉकबस्टर गेम, स्टुंडन्ट जर्नी,टीचर जर्नी फँटॅस्टिक सीट,डॉग स्टार, शब्दकोडे वाचनालय प्रतिकृती,हॅलो कोल्हापूर आजच्या घडामोडी,सेल्फी कट्टा, कवितेची मैफिल, चला करूया भारताची सफर, विद्यार्थी प्रवास, डिजिटल फल्स रोबो इत्यादी साहित्याची मांडणी विद्यार्थी व शिक्षकांनी आकर्षकरित्या केली आहे .
सदर प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी प्रशासन अधिकारी एस. के. यादव, शैक्षणिक पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे, विजय माळी,क्रीडा निरीक्षक सचिन पांडव, शांताराम सुतार रीडिंग प्रोग्रामच्या असोसिएट मॅनेजर मानसी चौहान, डिजिटल प्रोग्रॅमच्या असोसिएट मॅनेजर रश्मी सिंग, पर्यवेक्षक निशा साळवी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा  पद्मजा ओंकार,मुख्याध्यापिका नलिनी साळुंके,उपस्थित होत्या. 
 सदर प्रदर्शन पाहण्यासाठी परिसरातील संत रोहिदास विद्यालय, वीर कक्कय विद्यालय ,लक्ष्मीबाई जरग नगर विद्यालय, सर्वपल्ली राधाकृष्ण विद्यालय, उर्दू सरनाईक वसाहत विद्यालय या विद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी ,शिक्षक पतसंस्थेचे सभापती उमर जमादार,उपसभापती कुलदीप जठार,सुजाता पोवार,मयुर जाधव,स्वाती सुर्यवंशी ,दिपाली कुंभार,डॉ स्वाती पाटील ,नितिन खुडे,शकील भेंड़वाड़े,संदीप सुतार व शाळेचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमृता खुडे व सविता जमदाडे यांनी केले. मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापिका नलिनी साळुंके यांनी केले. प्रास्ताविक संजय पाटील  यांनी केले.कार्यक्रमाची रूपरेषा कविता कांबळे यांनी मांडली.तर आभार अनिल शेलार यांनी मांडले.

No comments:

Post a Comment