Saturday, 25 February 2023

जुन्या पेन्शनसाठीचा ४ मार्चचा मोर्चा यशस्वी करणार : शिक्षक आमदार प्रा.जयंत आसगावकर शैक्षणिक व्यासपीठ, शासकिय व निम शासकिय कर्मचारी समन्वय समितीचा निर्धार


कोल्हापूर /प्रतिनिधी
१ नोव्हेंबर २००५ पूर्वी व त्यानंतर नियुक्त करण्यात आलेल्या सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर सेवक, शासकिय कर्मचारी विद्यापीठ व महाविद्यालयान शिक्षक, शिक्षकेत्तर सेवक यांना जुनी पेन्शन योजना लागू झालीच पाहिजे यासाठी माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखालील जिल्हाधिकारी कार्यालयावर दि. ४ मार्च रोजी काढण्यात येणारा भव्य मोर्चा शंभर टक्के यशस्वी करणार असा निर्धार शिक्षक आमदार प्रा.जयंत आसगावकर तसेच कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ, कोल्हापूर जिल्हा शासकीय निम शासकीय कर्मचारी, विद्यापीठ व महाविद्यालयीन क्षेत्रातील सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापक संघाच्या विद्याभवन येथे आयोजित विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या सभेत निर्धार केला. अध्यक्षस्थानी शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस. डी. लाड होते.
       आमदार प्रा. जयंत आसगावकर 
सभेस मार्गदर्शन करतांना म्हणाले या मोर्चाची एकमेव मागणी म्हणजे सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करून घेणे. यासाठी सातत्याने सर्व संघटनांनी ताकदीनिशी मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.
    शनिवार दिनांक ४ मार्च रोजी निघणाऱ्या या मोर्चाची सुरुवात  सकाळी ११ वाजता शिवाजी पेठेतील गाधी मैदान येथून होईल. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा  पोहचेले नंतर मोर्चाचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन देतील.
      कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक,उच्च माध्यमिक महाविद्यालयीन प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर सेवक विद्यापीठ व महाविदयालयीन शिक्षकेत्तर सेवक, शिवाजी विद्यापीठ सेवक संघ, सुटा व 
सुफ्टाचे सर्व सदस्य व अनेक संघटना या मोर्चात सहभागी होणार आहेत.
    या सभेस चेअरमन सुरेश संकपाळ,शिक्षक नेते दादा लाड डॉ. डी. एस. घुगरे, बी. जी. बोराडे, वसंतराव देशमुख,प्रा.सी.एम.गायकवाड,
बाबासाहेब पाटील, खंडेराव जगदाळे, सुधाकर निर्मळे, प्रा. अविनाश तळेकर, सतिश बर्गे,उदय पाटील, मोहन भोसले, व्ही. जी. पोवार, गौतम वर्धन, प्रसाद पाटील, सुधाकर सावंत, आर.डी. पाटील, बी.डी. पाटील. पी. एस. हेरवाडे, प्रा. रघुनाथ ढमकले,मिलींद भोसले, आण्णासाहेब बागडे, संदीप पाथरे,अरुण मुजुमदार, इरफान अन्सारी,जगदीश शिर्के, अनिल घाडगे,मनोहर जाधव, 
प्रा. हजारी, शिवाजी लोंढे आदीसह शिक्षक व शिक्षकेत्तर  संघटनाचे जिल्हाध्यक्ष सचिवसह अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येंनी उपस्थित होते.
    फोटो 
कोल्हापूर :  शैक्षणिक व्यासपीठ, शासकिय व निम शासकिय  समन्वय समितीच्या बैठकीत मार्गदर्शन करतांना शिक्षक आमदार प्रा.जयंत आसगावकर शेजारी एस. डी. लाड, दादा लाड, बी. जी. बोराडे ,चेअरमन सुरेश संकपाळ आदी मान्यवर.

No comments:

Post a Comment