Thursday, 9 February 2023

संकल्प निरोगी महाराष्ट्राचा अंतर्गत हेरलेत महाआरोग्य शिबिर संपन्न

२०४ रुग्णांनी घेतला लाभ

हेरले /प्रतिनिधी
 राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या वाढदिवसानिमित्त व राज्याचे आरोग्य मंत्री  तानाजी सावंत  यांच्या संकल्पनेतून राज्यातील सर्व गरजू व गरीब रुग्णांना चांगले आरोग्य लाभावे यासाठी   प्राथमिक आरोग्य केंद्र हेरले येथे गुरुवारी महाआरोग्य शिबिर संपन्न झाले. 
    दीपप्रज्वलन सरपंच  राहुल शेटे  उपसरपंच बख्तियार जमादार, मुनिर जमादार ग्रामपंचायत सदस्य अमित पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. तसेच आरोग्य शिबीराची माहिती वैद्यकीय अधिकारी  डाॅ.राहुल देशमुख  यांनी सर्व उपस्थित ग्रामस्थ व रुग्णांना दिली.  सरपंच राहुल शेटे  व अन्य पदाधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. औषध निर्माण अधिकारी  सोनवणे यांनी आभार मानले. 
   शिबिरामध्ये एकूण २० ४रुग्णांनी लाभ घेतला. त्यामध्ये बालरोग व स्त्री रोग तज्ञ डॉ. राहुल देशमुख, ट्युलिप हॉस्पिटल  कडील अस्थिरोग तज्ञ डॉ. दीपक देशपांडे व हृदया हॉस्पिटल कडील जनरल मेडिसिन श्रीनाथ कुलकर्णी यांनी तपासणी करून योग्य तो औषध उपचार दिला.या शिबिरासाठी प्रा.आ. केंद्राकडील आरोग्य सहायक, सहायिका,आरोग्य सेवक, सेविका,  सी एच ओ,  वाहन चालक, परिचर, आशा सेविका गटप्रवर्तक यांचे मोलाचे योगदान लाभले.
  फोटो 
हेरले : येथील आरोग्य शिबीर प्रसंगी वैद्यकीय अधिकारी  डाॅ.राहुल देशमुख मार्गदर्शन करतांना शेजारी उपस्थित सरपंच राहुल शेटे, उपसरपंच बख्तियार जमादार, मुनिर जमादार ग्रामपंचायत सदस्य अमित पाटील आदी मान्यवर.

No comments:

Post a Comment