कोल्हापूर/प्रतिनिधी:
पुणे येथे झालेल्या राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत हनुमान नगर कोल्हापूर येथील उत्कर्ष राजाराम प्रभुखानोलकर याने देशात प्रथम क्रमांक मिळविला. सानेगुरुजी वसाहत येथील सांजदीप अकॅडमीचा विद्यार्थी असलेला उत्कर्ष हा श्रीमती लक्ष्मीबाई जरग विद्यामंदिर जरगनगर येथे इयत्ता तिसरीत शिकत आहे. त्याने 5.10 मिनिटामध्ये शंभर गणिते सोडवून प्रथम क्रमांकाचे बक्षिस सायकल व आकर्षक ट्रॉफी जिंकली आहे.
या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गोवा, कर्नाटक, गुजरातसह देशभरातून २२०३ विद्यार्थी सहभागी झाले होते. यात सहा देशांमधून ऑनलाइन परीक्षा दिलेल्या काही विद्यार्थ्यांचाही समावेश होता. यामध्ये उत्कर्षने लेवल झिरो विभागामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला, त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
या स्पर्धेत सांजदीप अकॅडमीच्या २० विद्यार्थांनी विविध लेवलच्या परीक्षेत सहभाग घेतला, त्यामधील तब्बल १६ विद्यार्थी ट्रॉफी विनर ठरले आहे. 'मोस्ट एनर्जेटीक सेंटर' म्हणून यावेळी सांजदीप अकॅडमीचा गौरव करण्यात आला.
उत्कर्षला सांजदीप अकॅडमीच्या संचालिका सौ. संजना घोदे, टीचर सौ. अस्मिता बाबर, आई सौ. नूतन प्रभुखानोलकर यांचे मार्गदर्शन लाभले. त्याचबरोबर जरगनगर विद्यामंदिरच्या वर्गशिक्षिका सौ. निलोफर अत्तार यांचे सहकार्य लाभले.
No comments:
Post a Comment