कोल्हापूर /प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य शासकिय व निमशासकिय कर्मचारी, शिक्षक व शिकेत्तर सेवक समन्वय समितीने १४ मार्च पासून पुकारलेल्या बेमुदत संपात कोल्हापूर जिल्हयातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा१०० टक्के सहभागी होवून जुनि पेन्शन योजना महाराष्ट्र शासनाला लागू करायला लावणारच असा निर्धार कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपिठाच्या सभेत करण्यात आला. मुख्याध्यापक संघाच्या विद्या भवन येथे संपन्न झालेल्या सभा अध्यक्षस्थानी एस.डी लाड होते.
संपात सहभाग घेतला तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये म्हणून इ१०वी व १२वी बोर्ड परीक्षेची सर्व कामे केली जातील पण कर्मचारी मस्टरमध्ये सह्या करणार नाहीत . असा निर्णय सभेत घेण्यात आला.
सभाध्यक्ष एस.डी लाड म्हणाले की सर्व कर्मचारी , मुख्याध्यापक / प्राचार्य व संस्थाचालक यांनी संपात सहभागी होवून संप १०० % यशस्वी करायचा आहे .
१४ मार्च रोजी सकाळी ११ वाजता कोल्हापूर शहर व करविर तालुक्यातील सर्व संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक, शिकेत्तर सेवक टाऊन हॉल येथे संग्राम उदयानात जमायचे आहे . इतर तालुक्यातील कर्मचाऱ्यांनी तालुक्याच्या ठिकाणी प्रांत कार्यालयासमोर उपस्थित रहावे असे ठरले.
या सभेला
शिक्षक नेते दादासाहेब लाड,सचिव दत्ता पाटील, राजाराम वरुटे , बाबा पाटील,
खंडेराव जगदाळे, सुधाकर निर्मळे, बी डी पाटील, प्रा सी. एम. गायकवाड , अरुण मुजुमदार, मनोहर जाधव,
प्रा. आण्णासो बागडी, सुधाकर सावंत, इरफान अन्सारी, राजेश वरक. करण सरनोबत. काकासाो भोकरे. उमेश देसाई, संदीप पाटील. बालाजी पांढरे, शिवाजी माळकर. विलास साठे, सतिश लोहार आदी मान्यवरांसह शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होत.
No comments:
Post a Comment