हेरले /प्रतिनिधी
महिलांनी आर्थिक स्वातंत्र्यावर लक्ष केंद्रीत करावे असे आवाहन सेबीचे राष्ट्रीय संसाधन सदस्य प्रा. डॉ. विजय ककडे यांनी केले. काॅन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री ( सीआयआय ) आणि इंडियन वूमन नेटवर्क ( आयडब्ल्यूएन ) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आर्थिक साक्षरता या विषयावर ते बोलत होते.
डॉ. ककडे म्हणाले, आर्थिक बाबतीत पती, मुलगा किंवा वडिलांवर अवलंबून राहण्याचा पूर्वीचा जमाना आता गेला. महिलांनी आर्थिक साक्षर झाले नाही तर भविष्यात कठीण प्रसंगांना त्यांना सामोरे जावे लागेल. आणि अशा अनेक घटनाही घडलेल्या आहेत. स्वत:च्या पैशाच्या बाबतीत जागरुगता हवी. महिलांची सर्वाधिक फसवणुक त्यांच्या जवळच्याच व्यक्तींकडून होते. याची दखल घेऊन योग्य काळजी घेतली पाहिजे. महिलांनी आपल्या आर्थिक स्वातंत्र्याची चिंता केली पाहिजे. आपल्या पतीच्या आर्थिक व्यवहारासोबतच वैयक्तिक आर्थिक व्यवहारांवर महिलांनी लक्ष केंद्रीत करायला हवे असे त्यांनी सांगितले.
यावेळी महिलांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना डॉ. ककडे यांनी उत्तरे दिली. महिलांनी पेपर गोल्ड, स्टॉक मार्केट, शेअर बाजार, पैसे गुंतवण्याचे ॲप्स, पैसे गुंतवण्यासंदर्भातील समज आणि गैरसमज याविषयीही प्रश्न डॉ. ककडे यांना प्रश्न विचारले. आयडब्लूएनच्या निमंत्रक गौरी शिरगांवकर यांनी प्रास्तविक केले.
सोनाली पटेल यांनी आभार मानले.
................
फोटो
कोल्हापूर : सीआयआय मार्फत आयोजित आर्थिक साक्षरता या विषयावरील व्याख्यानास उपस्थित सेबीचे राष्ट्रीय संसाधन सदस्य प्रा. डॉ. विजय ककडे, शेजारी आयडब्लूएनच्या निमंत्रक गौरी शिरगांवकर, सोनाली पटेल व महिला पदाधिकारी
......................................................................................
No comments:
Post a Comment