हेरले / प्रतिनिधी
हेरले (ता. हातकणंगले) येथील हिंदू व मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडवणाऱ्या हजरत पीर माॅसाहेब, हजरत पीर जबरबेग साहेब, हेरले यांच्या उरूसनिमित्त विविध धार्मिक व मनोरंजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवार दि.८ मार्च रोजी संदल( गंधरात्र). व रात्री ९-०० वाजता मोहसीन चिस्ती कवाल पार्टी बेंगलोर, व शाबिरा कवाल पार्टी बेळगाव हा कार्यक्रम होणार आहे.
गुरुवार दि.९ रोजी रात्री ९-०० वाजता रेखा पाटील कोल्हापूरकर यांचा लोकनाट्य तमाशा व पहाटे देवास गलेफ असा कार्यक्रम होणार आहे.
शुक्रवार दि. १० रोजी सारेगमपा ऑर्केस्ट्रा कोल्हापुर, यांचा कार्यक्रम होणार आहे.
या विविध मनोरंजन कार्यक्रमांचे उद्घाटन महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती पद्माराणी राजेश पाटील, माजी पंचायत समिती सदस्या मेहरनिगा मुनीर जमादार, माजी सभापती राजेश पाटील, जवाहर साखर कारखाना संचालक आदगोंडा पाटील,
सरपंच राहुल शेटे, उपसरपंच
महंमदबक्तीयार जमादार, स्वाभिमानी शेतकरी संघटना सरचिटणिस मुनीर जमादार,माजी सरपंच झाकीर देसाई, माजी सरपंच रियाज जमादार, एपीआय अस्लम खतीब आदी मान्यवरांसह उद्योगपती, कॉन्ट्रॅक्टर, माजी, आजी ग्रामपंचायत सदस्य,समाजिक कार्यकर्ते, पत्रकार, विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी, तरुण मंडळांचे पदाधिकारी यांचीही प्रमुख उपस्थित असणार आहे. तरी हेरले परिसरातील नागरिकांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन उरूस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment