पत्रकार माजी सरपंच कै. बाळासाहेब कोळेकर यांनी स्थापन केलेली
श्री.छत्रपती शिवाजी विकास सेवा संस्था या रोपट्याचे वटवृक्षात रूपातंर संस्थेच्या उत्कृष्ट कारभारामुळे झाले आहे. या संस्थेत २०१७ मध्ये माजी सभापती राजेश पाटील व त्यांचे सहकारी संचालक यांनी सत्ता स्थापन करून सभासदांना कर्ज वाटप करून ती कर्जे शंभर टक्के वसुल केली म्हणूनच संस्थेच्या विकासासाठी व ऊर्जितावस्थेसाठी हे कार्य महत्त्वाचे ठरून संस्था नावारूपास आली आहे.सभासदांचे हित समोर ठेवून संस्थेने ७ कोटी कर्जे वाटप करून वसुल केली, संस्थेने भविष्यात १७ कोटी रुपयांचे कर्जे वाटप करण्याचे उद्दिष्ट ठेवावे. असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले. ते हेरले (ता. हातकणंगले) येथील श्री. छत्रपती शिवाजी विकास सेवा संस्थेच्या रौप्य महोत्सव सोहळ्या प्रसंगी बोलत होते.
माजी खासदार राजू शेट्टी पुढे म्हणाले, गेली चार वर्षात ऊसास तीन हजार रुपये दर मिळाला आहे. मात्र सद्या नांगरट, खते, बी बियाणे यांचे दर वाढले असल्याने एकरी १३ हजार रुपये ऊस उत्पादन खर्च वाढला आहे. तसेच एकरी ऊस उत्पादन ७ टनाने घटले असल्याने ३५ हजाराची पोकळी निर्माण झाली आहे. शेतक-यांचे शेती उत्पादनासाठी विकास सेवा संस्थेतील कर्जांचे फिरवा फिरवीत आयुष्य गेले होते. मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस पिकास दर मिळविण्यासाठी २००१ सालामध्ये चळवळ सुरू केली.आपल्या संघटनेच्या व्यापक चळवळीने ऊस दर मिळाल्याने उत्पादक शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर वाढून विकास झाला आहे.
प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराज व संस्थेचे संस्थापक कै. बाळासाहेब कोळेकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पाहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. प्राथमिक स्वरूपात सभासदांना भेट वस्तू मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आल्या. संस्थेचे नुतन पदाधिकारी, संचालक , ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी यांचे माजी खासदार राजू शेट्टी व अन्य मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.स्वागत व प्रास्ताविक संचालक स्वप्नील कोळेकर यांनी केले. सरपंच राहुल शेटे, प्रा. राजगोंड पाटील, चेअरमन अशोक मुंडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे हातकणंगले तालुका सरचिटणीस मुनिर जमादार, विजय कारंडे आदींनी मनोगते व्यक्त केली.
माजी सभापती राजेश पाटील म्हणाले, संचालक व सभासदसह सर्वांनी स्फुरण दिल्याने १ कोटीची संस्था ७ कोटीवर गेली. सर्वांनी सहकार्य केले आहे. सभासद अडचणीत असतांना त्यांना संस्थेने सहकार्य केले. त्यामुळे संस्था विकासात्मक घौडदौड करत आहे. सर्वांचे सहकार्य असेच सदैव राहु दे. भविष्य काळात सभासदांना काहीच कमी पडणार नाही.
डॉ. सनथकुमार खोत म्हणाले, सहकार संस्था चालविताना २ टक्के फायदयामध्ये संस्थेचे प्रशासन चालवावे लागते. जास्तीत जास्त स्वभांडवल उभा केल्यास संस्थेचा विकास होण्यास
स्व:भांडवल फायदेशीर ठरते त्यासाठी स्वयंभू बना. सहकारा शिवाय जगू शकत नाही. ऊस दर योग्य मिळत नाही.
खर्च पाहता ऊस पिक परवडत नाही. संस्था स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे तरच ऊर्जितावस्था येऊ शकते. सभासदांनी संस्थेत लक्ष दया. तीन संस्था एकत्र येऊन मोठी संस्था उभा करू शकता. खाजगीकरण येऊ लागल्याने गंभीर समस्या निर्माण झाली आहे त्यामुळे सहकार जगवा.
सूतगिरणीचे चेअरमन माजी जि.प. सदस्य डॉ. अशोक माने म्हणाले,
सहकार चळवळीमुळे सामान्यांना ताकद आहे. बँकांनी योजना लागू केल्या आहेत. विकास योजना सहकार विश्वासावर चालतात. कोल्हापूर जिल्हयात सहकारामुळे हाजारो लोकांना काम मिळाले. सहकार चळवळीने सभासद व शेतकऱ्यांना बळ दिले. माजी खासदार
राजू शेट्टी यांनी चळवळ केली त्यामुळे कारखाने जागे झाले अन शेतकऱ्यांना दर मिळाले.खते, औषधे स्वस्त मिळावेत म्हणून शासनावर दबाव आणला पाहिजे. बेरोजगारांना उदयोग वाढीसाठी सेवा संस्थेच्या माध्यमातून आर्थिक मदत करावी असे आवाहन केले. या संस्थेने सभासदांना भेट वस्तू वाटप केले हा उपक्रम स्तुत्य आहे.
या प्रसंगी माजी सभापती सावकर मादनाईक, जवाहर साखर कारखाना व्हा.चेअरमन बाबासो चौगुले, माजी सभापती डॉ. पद्माराणी पाटील, माजी पंचायत समिती सदस्या महेरनिगा जमादार, विलासराव नाईक, लक्ष्मण निंबाळकर, श्रीकांत सावंत,
उदय चौगुले, अमर वड्ड, ॲड. प्रशांत पाटील, अरविंद चौगुले, अभयसिंह पाटील,अबुबकर जमादार, आदी मान्यवरांसह विविध सहकार संस्थेचे पदाधिकारी, संचालक, सभासद, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.आभार व्हा. चेअरमन कपिल भोसले यांनी मानले.सूत्रसंचालन सुरेश चौगुले यांनी केले.
फोटो
हेरले: माजी खासदार राजू शेट्टी बोलतांना शेजारी माजी सभापती राजेश पाटील, सावकर मादनाईक, बाबासो चौगुले, अशोक माने,डॉ. सनथकुमार खोत, अशोक मुंडे व अन्य मान्यवर
No comments:
Post a Comment