केंद्रात निकाल एक नंबरी.....!!
मुरगुड विद्यालयाची सह्याद्री कमळकर , वैष्णवी सुतार कला शाखेत कागल तालुक्यात प्रथम
तर समरजीत घोरपडे विज्ञान शाखेत केंद्रात प्रथम,प्रज्ञा कदम द्वितीय. निरंजन कुंभार केंद्रात तिसरा....
कोल्हापूर / प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत येतील मुरगुड विद्यालय जुनियर कॉलेज मुरगुड मधील सह्याद्री गणपती कमळकर व वैष्णवी आनंदा सुतार या दोघींनी 88.83% मार्क मिळवून कला शाखेत कागल तालुक्यात प्रथम तर समरजीत दीपक घोरपडे याने 82.17 टक्के गुण प्राप्त करून विज्ञान शाखेत केंद्रात प्रथम , तर प्रज्ञा कदम हिने 82 टक्के मार्क मिळवून केंद्रात द्वितीय क्रमांक पटकावला. निरंजन कुंभार याने 80.33 टक्के गुण मिळवून केंद्रात तिसरा क्रमांक पटकावला. मुरगुड विद्यालय जुनियर कॉलेज चा 96.67 टक्के निकाल लागला आहे.
शाखा निहाय निकालामध्ये विज्ञान विभाग 100 टक्के, वाणिज्य विभाग 96.67 टक्के तर कला विभाग 94. 47% निकाल लागला आहे. प्रविष्ट विद्यार्थी...333, परीक्षेला बसले...331, गैरहजर..2, एकुण पास...320
शाखा निहाय गुणानुक्रमे ......
विज्ञान शाखा
समर्जित दीपक घोरपडे (82.17 केंद्रात प्रथम मुरगुड ),
प्रज्ञा गणपती कदम( 82केंद्रात दुसरा सोनगे ),
निरंजन सुरेश कुंभार( 80.33.केंद्रात तिसरा कुरुकली ) प्रतीक्षा संभाजी चौगले( 76.33 चिमगाव)
कला शाखा..
सह्याद्री गणपती कळमकर 88.83 कागल तालुक्यात प्रथम ...सुरूपली )
वैष्णवी आनंदा सुतार( 88.83 कागल तालुक्यात प्रथम.निढोरी )
पूजा दत्तात्रय ढोणे( 80 केंद्रात चौथी.यमगे )
दिशा बबन फगरे (78.50.केंद्रात पाचवा )
वर्षा तानाजी पाटील (78 केंद्रात सहावा,यमगे)
अनुराधा मारुती शिंदे (75 .50.कंरजिवणे)
प्रतिक्षा पुंडलिक रजपूत (74 .50, )
आरती राजेंद्र पाटील (74. 17 निढोरी)
धनश्री तानाजी रेपे( 73 .33 चौंडाळ)
वाणिज्य शाखा..
मनाली अशोक पाटील( 77. 17 प्रथम)
साक्षी सदाशिव कळंत्रे( 76 दुसरा)
तन्वी नामदेव जाधव (72 .67 तिसरा)
वैष्णवी पांडुरंग पाटील( 72. 50 चौथा)
यशस्वी विद्यार्थ्यांना शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरचे सेक्रेटरी प्रा. जयकुमार देसाई साहेब, अध्यक्षा श्रीमती शिवानीताई देसाई, उपाध्यक्ष शिवाजीराव सावंत, चेअरमन मंजिरी देसाई मोरे ,युवा नेते , पेट्रन कौन्सिल मेंबर , दौलतराव देसाई, कोजिमाशीचे ज्येष्ठ संचालक, कौन्सिल मेंबर बाळ डेळेकर, शालेय समिती चेअरमन प्रवीणसिंह पाटील, प्राचार्य एस. आर .पाटील, उपप्राचार्य एस. पी. पाटील यांचे प्रोत्साहन व सर्व विषय शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. जुनिअर कॉलेजचा यावर्षीचा निकाल चांगला लागल्याने पालक, विद्यार्थी वर्गात समाधानाचे वातावरण दिसत आहे.
No comments:
Post a Comment