शिरोली/ प्रतिनिधी
शिरोली ग्रामस्थांच्या वतीने सरपंच व उपसरपंच यांना ग्रामदैवत मसोबा देवालयाच्या जागेवरील अतिक्रमण काढावे व त्या ठिकाणी भिंतीचे किंवा तारेचे कुंपण घालून नागरिकांसाठी इतर सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात या मागणीसाठी १००० ग्रामस्थांच्या सह्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी सरपंच सौ. पद्मजा करपे व उपसरपंच अविनाश कोळी यांनी सदर जागेचा पूर्वी केलेला मोजणी अहवाल मागून घेऊन त्वरित अतिक्रमण काढून कुंपण घालण्याचे आश्वासन दिले.
यावेळी कृती समितीच्या वतीने विठ्ठल पाटील, बाळासाहेब पुजारी, गिरीश फोंडे, अमृत उनाळे,रंगराव उनाळे, प्रशांत कागले, मानसिंग गावडे, योगेश खवरे, दशरथ पुजारी, दीपक उनाळे, रामचंद्र बुडकर, राजेंद्र पाटील, हरी पुजारी, वीरेंद्र मालेकर,ज्योती कांबळे, विशाल फोंडे, महेश फोंडे इत्यादी नागरिक उपस्थित होते.
तसेच माजी ग्रामपंचायत सदस्य पिंटू करपे व ग्रामपंचायत सदस्य महंमद महात यांनी देखील शिष्टमंडळाची चर्चा केली.
शासकीय पातळीवर अक्षम्य गलथानपणाचे हे मूर्तिमंत उदाहरण आहे. यानंतर आतापर्यंत हे प्रकरण प्रलंबित आहे.
ग्रामपंचायत पासून ते तहसीलदार प्रांत कार्यालयापर्यंत या गोष्टीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे यावर पक्के काँक्रीटचे बांधकाम करण्याच्या तयारीत आहे. आपण त्वरित कारवाई करून हे अतिक्रमण काढावे. ग्रामस्थ यांच्या मसोबा देवालय व देवालयाच्या जागेसंबंधीच्या भावना तीव्र आहेत. आपण या एका महिन्याभरात कारवाई न केल्यास गावकऱ्यांच्या समोर आंदोलन करण्याशिवाय कोणताही पर्याय उरणार नाही. असा इशारा काँ. गिरीश फोडे यांनी यावेळी दिला
फोटो.....
पुलाची शिरोलीत ग्रामस्थांचे ग्रामपंचायतीला निवेदन सादर करताना काँ. गिरीश फोंडे, विठ्ठल पाटील रंगराव उनाळे, बाळासाहेब पुजारी आदी.
No comments:
Post a Comment