हेरले /प्रतिनिधी लोककल्याणकारी राजा राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून ग्रामपंचायतीच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. सदरच्या वृक्षारोपण शुभारंभापूर्वी ग्रामपंचायतीच्या वतीने लोकनियुक्त सरपंच कस्तूरी पाटील व उपसरपंच सुनिल खारेपाटणे यांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या आवारात विविध प्रकारच्या वृक्षांचे वृक्षारोपण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सरपंच कस्तुरी पाटील, उपसरपंच सुनिल खारेपाटणे , ग्रामसेविका भारती ढेंगे , ग्रा.पं. सदस्य सुरेश कांबरे, रघूनाथ गोरड, स्वप्नील चौगुले, सविता सावंत, सुवर्णा सुतार, माजी सदस्य अविनाश पाटील, अमोल झांबरे, ज्ञानेश्वर सावंत, यांच्यासह ग्रा.पं. कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment