हेरले /प्रतिनिधी
आपल्या आहारामध्ये तृणधान्य , भरड धान्य पिकांचे खूप महत्व असून त्याचा आपल्या आहारामध्ये वापर वाढविला पाहिजे असे प्रतिपादन कृषी विज्ञान केद्र, तळसंदे येथील दिपाली म्हस्के यांनी व्यक्त केले. त्या मौजे वडगाव (ता. हातकणंगले) येथील ग्रामपंचायतीच्या सभागृहात महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या कृषी संजीवनी सप्ताह निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच कस्तूरी पाटील होत्या.
यावेळी कृषी मंडळ अधिकारी नंदकुमार मिसाळ व कृषी सहाय्यक सचिन आलमाने यांनी कृषी विभागाच्या विविध योजना व खरिप हंगामा बाबत मार्गदर्शन करून शासनाच्या विविध योजनाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले. यावेळी गावातील ६० ते ७० शेतकऱ्यांना सोयाबीन बियानांच्या मिनिकिटचे मोफत वाटप करण्यात आले.
यावेळी उपसरपंच सुनिल खारेपाटणे , ग्रामसेविका भारती ढेंगे , ग्रा.पं. सदस्य सुरेश कांबरे, रघूनाथ गोरड, सविता सावंत, सुवर्णा सुतार, रावसो चौगुले ,अविनाश पाटील, अमोल झांबरे , महादेव जाधव, मनोहर चौगले , यांच्यासह शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक रमेश परिट यांनी केले तर आभार उमेश सकटे यांनी मानले.
No comments:
Post a Comment