Wednesday, 19 July 2023

मुख्याध्यापक संघाचे सर्व उपक्रम, योजना प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय : कौन्सिल सदस्यांची बैठक संपन्न


हेरले / प्रतिनिधी
     कोल्हापूर जिल्हा माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे सर्व उपक्रम, योजना अधिक जोमाने व प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय संघाच्या कार्यकारी मंडळ व कौन्सिल सदस्यांच्या बैठकीत घेण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक संघाचे चेअरमन सुरेश संकपाळ होते. 
      संघाच्या वतीने शाळा, तालुका व जिल्हा स्तरावर विविध स्पर्धा घेण्यात येतात. तसेच गणित प्राविण्य व प्रज्ञा परीक्षा, विज्ञान प्रज्ञा शोध परीक्षा, इ.१० वी सोशल टॅलेंट सर्च परीक्षा, स्वच्छ सुंदर शाळा, उत्कृष्ट शालेय समृद्ध ग्रंथालय स्पर्धा यासह विविध स्पर्धा राबविल्या जातात.
     या बैठकीत शाळा सिद्धी, शाळा वार्षिक तपासणी, अद्ययावत शालेय अभिलेखे जतन याबाबत मार्गदर्शन तसेच विद्यार्थी गुणवत्ता वाढीचे उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविणेबाबत चर्चा करण्यात आली. तसेच संघाची प्रकाशने, विविध उपक्रमात शाळांचा सहभाग वाढविणे. संघामार्फत तालुकास्तरीय मुख्याध्यापक सहविचार सभा घेऊन विविध विषयावर मार्गदर्शन करणे. सेवानिवृत्त मुख्याध्यापक सत्कार व नवीन मुख्याध्यापकांचा सत्कार समारंभ घेण्याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी एच.वाय.शिंदे, बाजीराव साळवी, आर.वाय.देसाई, श्री. गोसावी, बाबुराव राजीगरे, सौ.स्नेहा नितीन भुसारी, सौ. आर. ए.माने, सौ. पी. एस. टिपूगडे यांनी चर्चेत सहभाग घेतला.
     यावेळी मुख्याध्यापक संघाचे चेअरमन सुरेश संकपाळ, व्हा.चेअरमन मिलिंद पांगिरेकर, सहसचिव अजित रणदिवे, लोकल ऑडीटर इरफान अन्सारी, संपर्क प्रमुख अशोक हुबळे, सेवानिवृत्त सदस्य जीवनराव साळोखे, शिवाजी माळकर, संचालक सूर्यकांत चव्हाण, बबन इंदुलकर, सौ.अनिता नवाळे, सौ. सारिका यादव, सुरेश उगारे, श्रीकांत पाटील, पी. व्ही. पाटील, माझीद पटेल यांच्यासह संघाचे कार्यकारी मंडळ व कौन्सिल सदस्य उपस्थित होते. 
      प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक  चेअरमन सुरेश संकपाळ यांनी आभार व्हा.चेअरमन मिलिंद पांगिरेकर यांनी तर सूत्रसंचालन संचालक रवींद्र मोरे यांनी केले.

No comments:

Post a Comment