कोल्हापूर दिनांक 22--
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा 61 वा हिरक महोत्सवी वर्धापन दिन विविध उपक्रमांनी संपन्न झाला. या वर्धापन दिनानिमित्त शिक्षक समिती कोल्हापूर शहर शाखेच्या वतीने मनपा वीर कक्कय विद्यालयास स्मार्ट टीव्ही प्रदान करण्यात आला.
त्याचबरोबर शाळेच्या प्रांगणामध्ये संघटनेच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. हीरक महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने मनपा शाळेला विविध सदस्यामार्फत पाच लाख रुपयांची मदत करण्याचे शिक्षक समितीच्या वतीने ठरविण्यात आले होते. त्याप्रमाणे गेल्या वर्षभरामध्ये महानगरपालिकेच्या विविध शाळांना चाळीसहून अधिक स्मार्ट टीव्ही, फर्निचर, साऊंड सिस्टिम, आदी माध्यमातून पाच लाख रुपये देणगीचा टप्पा सदस्यांनी ओलांडला. त्याबद्दल सर्व सदस्यांचे शिक्षक समितीच्या वतीने आभार मानण्यात आले.
यावेळी शिक्षक समितीच्या इतिहासाबद्दल व भविष्यात येऊ घातलेल्या शैक्षणिक धोरणाबद्दल शिक्षक समितीचे राज्य प्रमुख सुधाकर सावंत यांनी मार्गदर्शन केले त्यावेळी उपाध्यक्ष उमेश देसाई, यांनी मनोगत व्यक्त केले.
श्री संजय कडगावे यांनी प्रास्ताविक केले . श्री संजय पाटील यांनी आभार मानले. त्यावेळी पतसंस्थेचे चेअरमन श्री उमर जमादार, श्री शकील भेंडवाडे, श्री वसंत आडके,श्री फारूक डबीर,श्री सुनील नाईक,राजश्री पोळ,वहिदा मोमीन,रुक्साना शेख ,स्वाती संकपाळ,सुनीता चौगले, श्री तानाजी पाटील,श्री.रुपेश नाडेकर,श्री शांताराम पोळ,श्री उत्तम कुंभार,श्री सुनिल पाटील, श्री युवराज सरनाईक,श्री अनिल शेलार आदि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment