Tuesday, 11 July 2023

मौजे वडगाव ते नागाव रस्त्याच्या कडेला धोकादायक चरीत भराव टाकण्याची मागणी

हेरले /प्रतिनिधी

मौजे वडगांव (ता. हातकणंगले) ते नागाव या गावच्या रस्तावर एचपी ऑईल गॅस प्रायवेट लिमिटेडने गॅस पाईप घातली आहे. श्री सदगुरू निरंजन महाराज आश्रम ते प्राथमिक शाळा दरम्यान तीनशे ते चारशे फूट लांब रस्ताच्या बाजूला तीन ते चार फूट भर न घातल्याने येथे ही पाईप लाईन दोनच फूट खाली असल्याने धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. तरी या कंपनीने येथे तात्काळ भर टाकावी अशी मागणी नागरिकातून होत आहे.
     मौजे वडगाव ते नागाव रस्त्याच्या बाजूने एचपी ऑईल गॅस प्रायवेट लिमिटेडने अंडर ग्राउंड गॅस पाईप लाईन  नेली आहे. ही पाईप लाईन सहा फूट जमिनाच्या आत खोल खनून  नेली आहे. मात्र श्री सदगुरू निरंजन महाराज आश्रम ते प्राथमिक शाळा या ठिकाणी  तीनशे ते चारशे फूट लांबीच्या या दरम्यान ही गॅस पाईप लाईन दोनच फूट खोल आहे. येथे मोठी चर पडली आहे त्यावर चार फूट मुरूमाची भर टाकणे आवश्यक आहे. आश्रमामध्ये भक्तांची व प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांची दररोज  ये जा असल्याने त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे ठिकाण धोक्याचे बनले आहे.
      काही दिवसा पूर्वीच शिरोली एमआयडीसीमध्ये अचानक गॅस पाईप लिक होऊन गॅसचे फवारे हवेत कित्येक वेळ उडाल्याने नागरिकात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. तरी अशा प्रकारच्या अपघाताची स्थिती गॅस पाईप लाईनवर सहा फूट खोलीचा भराव नसल्याने मौजे वडगाव ते नागाव रस्त्यालगत श्री सदगुरू निरंजन महाराज आश्रम ते प्राथमिक शाळा या चारशे फूट लांबीच्या ठिकाणी उदभवन्याची शक्यता निर्माण होऊ शकते. यासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने या कंपनीने येथे तात्काळ भर टाकावी अशी मागणी नागरिकातून व पालकातून होत आहे.
         फोटो 
मौजे वडगाव : येथील श्री सदगुरू निरंजन महाराज आश्रम ते प्राथमिक शाळा या चारशे फूट लांबीच्या ठिकाणी गॅस पाईप लाईनवर सहा फूट खोलीचा भराव नसल्याने चार फूट खोलीच्या चरीत झाडे झुडपे उगवली आहेत.

No comments:

Post a Comment