हेरले / प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक पतसंस्थेच्या नूतन चेअरमनपदी लक्ष्मण उर्फ बाळ डेळेकर कागल यांची तर व्हाईस चेअरमनपदी प्रकाश कोकाटे शाहूवाडी यांची संचालक मंडळाच्या बैठकित बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडी शिक्षक नेते दादासाहेब लाड यांच्या मार्गदर्शनाखाली झाल्या. बैठकिच्या अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी सुनील धायगुडे होते. निवडीनंतर समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करून गुलालाची उधळण केली.निवड प्रक्रियेचे वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत कुरडे यांनी केले
शाहुपुरी येथील मुख्य कार्यालयात झालेल्या या बैठकित चेअरमनपदासाठी बाळ डेळेकर व व्हाईसचेअरमनपदासाठी प्रकाश कोकाटे यांचे एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी सुनील धायगुडे यांनी या निवडी बिनविरोध झाल्याचे घोषित केले. चेअरमन पदासाठी बाळ डेळेकर यांचे नाव संचालक राजेंद्र रानमाळे यांनी तर व्हाईस चेअरमन पदासाठी प्रकाश कोकाटे यांच नाव संचालक अविनाश चौगले यांनी सुचविले.
यावेळी संचालक राजेंद्र रानमाळे, दत्तात्रय घुगरे, अनिल चव्हाण, प्राचार्य श्रीकांत पाटील, मदन निकम, सुभाष खामकर, अविनाश चौगले, दिपक पाटील, राजेंद्र पाटील, श्रीकांत कदम, जितेंद्र म्हैशाळे, शरद तावदारे, उत्तम पाटील, पांडुरंग हळदकर, मनोहर पाटील, सचिन शिंदे, राजाराम शिंदे, सौ ऋतुजा पाटील, शितल हिरेमठ आदीसह प्रशासन अधिकारी उत्तम कवडे, संगणक अधिकारी नितीन शिंदे आदी उपस्थित होते.
निवडीनंतर नुतन चेअरमन व्हाईस चेअरमन यांचा सत्कार शिक्षक नेते दादासाहेब लाड यांच्या हस्ते करण्यात आला. सभासदांनी स्वाभिमानी सहकार आघाडीवर विश्वास ठेवून चौथ्यांदा एकहाती सत्ता दिली. त्यामुळे सभासदांचे हित डोळ्यासमोर ठेऊन दिलेल्या वचननाम्याची वचनपुर्ती टप्याटप्याने केली जाईल अशी ग्वाही आघाडीप्रमुख दादासाहेब लाड यांनी यावेळी दिली.
आघाडीचे नेते दादासाहेब लाड यांनी आमच्यावर टाकलेला विश्वास सार्थ करण्यासाठी सर्वांना विश्वासात घेऊन काटकसरीचा आदर्शवत असा पारदर्शी कारभार केला जाईल असे प्रतिपादन सत्काराला उत्तर देताना चेअरमन बाळ डेळेकर व व्हाईस चेअरमन प्रकाश कोकाटे यांनी केले .
No comments:
Post a Comment