Friday, 11 August 2023

शिस्तीचे धडे देणारे गुरुकुल शिक्षण समूह:- भैरव तळेकर

हेरले /प्रतिनिधी
 आदर्श गुरुकुल विद्यालय व ज्युनि कॉलेज पेठ वडगाव मध्ये १ ऑगस्ट ते ९ ऑगस्ट क्रांती सप्ताह निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते . विद्यार्थ्यांनी क्रांतिकारकांच्या जीवनावरती आधारित पुस्तकांचे वाचन केले, तसेच सप्ताहाच्या सांगता समारंभावेळी विविध क्रांतिकारकांच्या जीवनावर आधारित नाट्यीकरण सादर केले . या कार्यक्रमाप्रसंगी पेठ वडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भैरव तळेकर , पोलीस उपनिरीक्षक प्रिया खाडे तसेच वडगाव नगरपालिकेचे कक्ष अधिकारी मुकुंद कदम , प्रशांत पाटील आदर्श गुरुकुल शिक्षण समूहाचे संस्थापक डॉ डी एस घुगरे तसेच संस्थेच्या सचिव तथा मुख्याध्यापिका सौ एम.डी. घुगरे मॅडम उपस्थित होत्या. या कार्यक्रम प्रसंगी बोलताना भैरव तळेकर म्हणाले आदर्श गुरुकुल शिक्षण समूहातील मुलांना शिस्तीचे, देश प्रेमाचे धडे दिले जातात. त्यामुळे भारताचे सुजाण नागरिक घडविण्याचे कार्य या संकुलात होताना दिसत आहे .विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी अशा थोर क्रांतिकारकांची माहिती विद्यार्थ्यांना मिळणे गरजेची होती . यावेळी प्रिया खाडे यांनी विद्यार्थ्यांना क्रांती दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
विविध विभागांचे प्रमुख व शिक्षक, विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला .
कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक पर्यवेक्षक शरद जाधव यांनी केले तर सूत्रसंचलन सोनाली शिखरे यांनी केले .

No comments:

Post a Comment