कोल्हापूर /प्रतिनिधी
संच मान्यता त्रुटी, शिक्षकांना बीएलओच्या ड्युटी व नुतन मान्यता मिळालेल्या शिक्षकांच्या शालार्थ आयडी मिळण्यास दिरंगाई आदीसह शिक्षकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी सर्व शिक्षक संघटनेंच्या माध्यमातून शिक्षण मंत्री यांच्या बरोबर बैठक घेऊन समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहे. असे प्रतिपादन शिक्षक नेते दादासाहेब लाड यांनी केले.
संत सोपानकाका सहकारी बैंक लि. सासवड, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने“संत सोपानकाका सुंदर माझी शाळा”पारितोषिक वितरण समारंभ २०२२ -२०२३ या वर्षातील कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या विद्याभवन शिवाजी पार्क,कोल्हापूर येथील सभागृहामध्ये संपन्न झाला. त्या प्रसंगी बोलत होते.स्वागत व प्रास्ताविक सचिव दत्ता पाटील यांनी केले. अध्यक्षस्थानी शिक्षक नेते दादासाहेब लाड होते.या प्रसंगी प्रमुख मान्यवर बी. जी. बोराडे,खंडेराव जगदाळे, प्राचार्य डी.एस. घुगरे आदींनी मनोगतातून शिक्षकांच्या समस्या सांगून उपाययोजना स्पष्ट केली.
विभागीय प्रथम क्रमांक माध्यमिक आश्रमशाळा रजपूतवाडी, द्वीतीय क्रमांक बालदास महाराज हायस्कूल शिरगाव सौते, जिल्हा स्तर प्रथम क्रमांक महाराष्ट्र हायस्कूल व ज्युनि. कॉलेज शिवाजी पेठ कोल्हापूर, द्वीतीय क्रमांक आदर्श हायस्कूल भामटे तृतीय क्रमांक जनतारा कल्पवृक्ष विद्यामंदिर व अक्काताई नरसाप्पा नांद्रेकर ज्युनि. कॉलेज जयसिंगपूर आदीसह ५ शाळांना पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
कोल्हापूर शहर व १२ तालुक्यातील प्रत्येक तालुक्यास तीन शाळांना संत सोपनकाका सुंदर माझी शाळा या पुरस्काराने ३९ शाळा व विभागीय दोन जिल्हास्तर तीन असे एकूण ४४ शाळांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, मानचिन्ह प्रमाणपत्र व पुस्तक देऊन सन्मानीत करण्यात आले.
या प्रसंगी कोजिमाशी चेअरमन प्राचार्य लक्ष्मण उर्फ बाळ डेळेकर, व्हा.चेअरमन प्रकाश कोकाटे,रघुनाथ मांडरे,संपर्क प्रमुख अशोक हुबाळे, समन्वयक मुख्याध्यापक शिवाजीराव कोरवी, राहुल पवार, एम. आर. पाटील, आदी मान्यवरांसह कोजिमाशी संस्थेचे संचालक मंडळ, मुख्याध्यापक ४४ शाळांचे व शिक्षकवृंद उपस्थित होते.आभार सागर चुडाप्पा,सुत्रसंचलन शिवाजी पाटील यांनी केले.
फोटो
“संत सोपानकाका सुंदर माझी शाळा” पुरस्कार शिक्षक नेते दादासाहेब लाड, सचिव दत्ता पाटील, बी. जी. बोराडे प्राचार्य डी. एस. घुगरे आदी मान्यवर पुरस्कार प्रदान करतांना स्विकरतांना कोजिमाशी चेअरमन वडगाव विद्यालयाचे प्राचार्य बाळ डेळेकर, उपमुख्याध्यापक सुधाकर निर्मळे आदीसह शिक्षकवृंद व अन्य मान्यवर
No comments:
Post a Comment